कोपरगाव/वेबटीम:- कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २आॕक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २आॕक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहाने संपन्न झाला.
श्री.गो.विदयालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.दीलीप तुपसैंदर यांच्या हस्ते झाले.
या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी राष्ट्रपुरुषांना अभिवादन केले.
विदयालयाचे पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर.बी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
विद्यालयाचे कला शिक्षक श्री.एस.डी.गोरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.जेष्ठ शिक्षक श्री.ई.एल.जाधव यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला,एन.के.बडजाते,ए.के.काले,डी.व्हि.विरकर श्री.चौधरी आर.जे,शिरसाळे एस.एन,सौ.बोरावके आर.आर,रायते यु.एस,महानुभाव के.एम,आदी शिक्षक,शिक्षिका सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत