कोपरगाव/प्रतिनिधी:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना लसीकरण करण्यासही प्राधान्य देत आहे. त्यानुसार कोपरगाव...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना लसीकरण करण्यासही प्राधान्य देत आहे. त्यानुसार कोपरगाव शहरात शनिवारी (ता.२) तब्बल १ हजार ६३७ व्यक्तींचे विक्रमी कोविड प्रतिबंध लसीकरण करण्यात आले.
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था काटेकोरपणे नियोजन करून नियमांची अंमलबजावणी करत आहे. कोपरगाव पालिका देखील शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे याकरिता
नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवकांच्या सहकार्याने डॉ. ए.पी.जे.अब्दुल कमाल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सहकारी आणि पालिका प्रशासन दैनंदिन प्रभागनिहाय लसीकरणाचे नियोजन करून शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजअखेर शहरातील एकूण पंधरा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर
शहरात तीन पथक तयार करून श्री दत्तमंदिर, दत्तनगर, श्री संत गोरोबाकाका मंदिर, गोरोबा नगर व नगरपालिका शाळा क्रमांक ५ बेट याठिकाणी कोविड प्रतिबंध लसीकरणाचा उच्चांक गाठून सुमारे १ हजार ६३७ नागरिकांचे लसीकरण यशस्वीपणे पार पाडले.
एवढ्या मोठ्या संख्येत लसीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
डॉ. गायत्री कांडेकर, रजनी मुसमाडे, लक्ष्मी पाठक, परिचारिका रोहिणी नाईक, सुरेखा कुमावत, शालिनी गायकवाड, नंदू नवले, पूजा नवले, विजया गायकवाड, आशा सेविका राखी पुरोहित, मंगल गवळी, वर्षा देसाई, सुरेखा थोरात, सुवर्णा वायखिंडे, योगिता गवूल, अनिता वैद्य, सपना दाभाडे, सोनपसारे, कदम यांच्यासह लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीसाठी नियंत्रण अधिकारी भालचंद्र ऊंबरजे, प्रवीण पोटे, पी.के.गायकवाड, सूर्यकांत गाडेकर, नियंत्रण अधिकारी महारुद्र गालट, नोडल अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदिंनी परिश्रम घेतले. याचबरोबर शहरातील विविध भागातील व्यापारी, नागरिक यांची दररोज आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजेन तपासणी शिबिराचे नियोजन करून दररोज सरासरी दोनशे ते दोनशे पन्नास व्यापारी/नागरिकांच्या कोविड तपासण्या सुरू आहे. यासाठी नगरपरिषदेचे स्वच्छता विभागाचे कर्मचाऱ्यांचे दोन पथक शहरातील विविध भागांमध्ये दैनंदिन कोविड तपासण्या करत आहेत. प्रभारी स्वच्छता निरीक्षक सुनील आरणे, मुकादम मनोज लोट, रवी दिनकर, विजय घोरपडे, विजय डाके, अरुण फाजगे, रणधीर तांबे, योगेश कोपरे, पवन हाडा, राजेंद्र तुजारे, आनंद वाल्हेकर, दीपक साळवे व आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदी मेहनत घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत