कोपरगाव/वेबटीम:- तालुका विधी सेवा समिती, वकील संघ आणि कोपरगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कायद...
कोपरगाव/वेबटीम:-
तालुका विधी सेवा समिती, वकील संघ आणि कोपरगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कायदेशीर जनजागृती प्रभात फेरी आज शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालयातून काढण्याण्यात आली, ही प्रभात फेरी जिल्हा सत्र न्यायालय येथून कोपरगाव शहरातील मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, धारणगाव रस्त्यावरून तहसील कार्यालय येथे पोहोचत प्रभात फेरीची सांगता झाली, कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा सत्र न्यायालयात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली, यावेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. बोधनकर, सयाजी कोऱ्हाळे यांनी उपस्थिताना या कायदेशीर जनजागृती उपक्रमाची माहिती दिली,
या कायदेशीर जनजागृती प्रभात फेरीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश रस्त्यावर उतरून जनजागृती करताना दिसून आले, यावेळी माननीय न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, नगरपरिषद व पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी, स्व. श्री.नामदेवरावजी परजणे पाटील लॉ कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका तसेच न्यायालयाचे कर्मचारी या जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते यावेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. बोधनकर, सयाजी कोऱ्हाळे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ श्रीमती सचदेव, सहदिवाणी न्यायाधीश बी.यु. मिसाळ, सहदिवाणी न्यायाधीश जे.एम.पांचाळ, दिवाणी न्यायाधीश एस.यु. डोईफोडे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. शेख, वकील संघाचे अध्यक्ष आशिष लोहोकणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, तालुका पोलिस निरीक्षक दौलत जाधव, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, अँडव्होकेट अशोक वहाडणे, अँडव्होकेट शंतनु धोर्डे, अँडव्होकेट जयंत जोशी, अँडव्होकेट एन.पी.येवले, अँडव्होकेट भास्करराव गंगावणे, अँडव्होकेट अशोक टूपके, अँडव्होकेट गुजराती, अँडव्होकेट संजय मंडलिक, स्व. श्री.नामदेवरावजी परजणे पाटील लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका अँडव्होकेट शितल तलवारे आदी उपस्थित होते,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत