कोंढवड येथे शेतकऱ्यामुळे मिळाले राष्ट्रीय पक्षी मोरास जीवनदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोंढवड येथे शेतकऱ्यामुळे मिळाले राष्ट्रीय पक्षी मोरास जीवनदान

राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील कोंढवड शिवारात गट नंबर 276 /1 मध्ये गणपत मोहन म्हसे यांच्या शेतात जखमी अवस्थेत राष्ट्रीय पक्षी मोर आढळून...

राहुरी(वेबटीम):-


राहुरी तालुक्यातील कोंढवड शिवारात गट नंबर 276 /1 मध्ये गणपत मोहन म्हसे यांच्या शेतात जखमी अवस्थेत राष्ट्रीय पक्षी मोर आढळून आला गणपत म्हसे यांनी तातडीने त्याला मदत करत वन विभागाच्या हवाली केले.

याबाबत अधिक माहिती अशी की कोंढवड येथील शेतकरी गणपत मोहन म्हसे हे नेहमी प्रमाणे त्यांच्या शेतामध्ये दुपारी तीन वाजेच्या दरम्यान गेले असता त्यांना तेथे जखमी अवस्थेत एक मोर आढळून आला त्यांनी त्याला जवळ जाऊन पाहिले असता तो जखमी अवस्थेत त्यांना आढळून आला.


 त्यांनी तातडीने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्याशी संपर्क साधला पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनीदेखील तातडीने राहुरीच्या वनविभागाची संपर्क साधत वनक्षेत्रपाल सचिन गायकवाड वनरक्षक सतीश जाधव वाहनचालक ताराचंद गायकवाड यांना घटनास्थळी पाठवले वरील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होत जखमी मोराला ताब्यात घेतले व त्याला पुढील औषधोपचारासाठी राहुरी येथे आणण्यात आले..

यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राहुरीचे वनरक्षक सतीश जाधव यांनी सांगितले की रात्री झालेल्या अतिपावसाने त्या मोराला झोडपले होते त्यामुळे तो जखमी झाला आहे त्याला सध्या वैद्यकीय उपचार देण्यात आले असून बारा तास वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून त्याची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याला पुन्हा वनामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे.


यावेळी  गणपत म्हसे यांनी तातडीने राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला जीवदान दिल्यामुळे त्यांचे सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे या कामी त्यांना  सामाजिक कार्यकर्ते तथा  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल हिवाळे ,विकास म्हसे, रुषिकेश भोंगळ, शरद म्हसे, अनिल म्हसे, गोरक्षनाथ म्हसे आदिनी सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत