देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी परीसरात विना परवाना फटाका विक्री जोमात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी परीसरात विना परवाना फटाका विक्री जोमात

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :-       देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत विना परवाना फटाका विक्री जोमात सुरु असुन पोलीस व महसुल प्रशासनाने हाताची...

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :-


     देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत विना परवाना फटाका विक्री जोमात सुरु असुन पोलीस व महसुल प्रशासनाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवून उघड्या डोळ्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला जात  असल्याचे पाहत आहे.

   देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी भागात विना परवाना फटाका विक्री जोमात सुरु असून किराणा दुकान, जनरल स्टोअर व घरात तसेच वाड्यावस्त्यावर फटाका विक्री केली जात आहे.नगर पालिका हद्दीत 18 व्यासयीकांनी फटाका विक्रीचा परवाना काढला आहे.त्यामध्ये देवळाली प्रवरात 8 तर राहुरी फँक्टरी येथे 10 व्यावसायिकांनी फटाका परवाना घेतला आहे.नगर पालिकेने परवाना काढण्यासाठी नाहरकत दाखला देण्यापुर्वी फटाका व्यावसायिकांसाठी मोकळ्या जागेचा लिलाव केला होता. 8 ते 9 हजार रुपये भरुन फटाका व्यावसायिकांनी लिलाव घेतले. नाहरकत  दाखल्यासाठी स्वतंञ फि आकारली आहे.लिलावाच्या वेळी नगर पालिकेने  व परवाना घेतेवेळी पोलीसांनी परवाना धारका व्यक्तीरिक्त फटाका व्यवसाय करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल आसे सांगितले होते.परंतू याकडे नगर पालिका, पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

   फटाका व्यासायिकांना दुकान लावण्यापूर्वी विस हजार रुपये खर्च करुन व्यवसाय सुरु करावा लागतो. विनापरवाना फटाका विक्री करणाऱ्या व्यावसायिकास कोणताही खर्च न करता व्यवसाय केला जात आहे.कर्जत, श्रीगोंदा, नगर येथे विना परवाना फटाका विक्री करणाऱ्या व्यावसायिका विरोधात जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याबद्दल पोलीस प्रशासनाने कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत. माञ देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी  येथिल ठराविक भागात सर्रास विना परवाना फटाका विक्री सुरु असुनही पोलीस,महसुल, नगर पालिका प्रशासन माञ उघड्या डोळ्याने पाहत असुनही कारवाई करण्याचे धाडस करीत नसल्याने परवाना धारक फटाका व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


   पोलीस, महसुल व नगर पालिका प्रशासनाने सयुंक्त कारवाई करुन विना परवाना फटाका विक्री करणाऱ्या व्यावसायिकांन विरोधात कारवाई करावी अशी मागणी देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथिल परवाना धारक फटाका व्यावसायिकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत