राहुरी फॅक्टरी/वेबटिम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती माऊली...
राहुरी फॅक्टरी/वेबटिम:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने दीपावलीनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला.शेकडो दिव्यांनी परिसर उजाळून निघाला होता. तर जगताप कन्स्ट्रक्शन कंपनीने पुढाकार पुतळा भोवताली आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
बुधवरी सायंकाळी माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने शेकडो पणत्या पेटविण्यात आल्या. यावेळी डॉ.योगेश पगारे, ओमकार कोबरणे, गणेश डावखर, ऋषि राऊत, योगेश राऊत, चैतन्य इंगळे, ऋषि वरखडे, सत्यम थीगळे, दीपक तनपुरे,शनी आढाव, शंतनू नालकर, प्रगतशील शेतकरी बाबा मुसमाडे, किशोर कोबरणे, विश्वनाथ राऊत आदिंसह नमित्र परिवार याठिकाणी उपस्थित होते.
जगताप कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा डी.बी.जगताप तात्या यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशाने उजाळून निघाला आहे. दरम्यान देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या जवानांनी पुतळा परिसरात पाणी मारून स्वच्छता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत