राहुरी(प्रतिनिधी) कोरोना काळात बंद असलेला वांबोरी येथील आठवडे बाजार तातडीने सुरू करावा अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्...
राहुरी(प्रतिनिधी)
कोरोना काळात बंद असलेला वांबोरी येथील आठवडे बाजार तातडीने सुरू करावा अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन आज बुधवार 23 नोव्हेंबर रोजी केली आहे.
वांबोरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.गागरे भाऊसाहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, कोरोना काळात वांबोरी येथील आठवडे बाजार बंद करण्यात आला होता. मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने व सर्वत्र कोविड लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात तसेच राहुरी तालुक्याती अनेक ठिकाणी बाजार सुरू केले असताना वांबोरी गावचा बाजार अद्याप सुरू करण्यात आला नाही. बाजार बंद असल्याने बाजारकरुंच्या पोटापाण्याचा प्रश्न गँभीर बनला आहे.
तरी वांबोरी गावातील आठवडे बाजार तातडीने सुरु करावा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा प्रदिप मकासरे व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे उपस्थित होते.यावेळी दत्तात्रय पुंड, मिननाथ व्यवहारे, निलेश मोरे, विजय सप्रे, समीर शेख, अमीर शेख, गिरीश पुंड, सुनील कुर्हे, बंडू जाधव, किरण पुंड, आरिफ आतार, जावेद आतार, संतोष जाधव, संतोष जाधव, गौरव मधूकर, अर्जुन पटारे, सागर जाधव, सुरेश आरोटे, निलेश पेहरे, बापू शिंदे, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत