कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव नगर पालिकेच्या लोक शाहीर अण्णा भाऊ साठे नाट्य गृहाची दयनीय अवस्था झाली होती मागील काही दिवसांपूर्वी या नाट्य गृहा...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव नगर पालिकेच्या लोक शाहीर अण्णा भाऊ साठे नाट्य गृहाची दयनीय अवस्था झाली होती मागील काही दिवसांपूर्वी या नाट्य गृहाच्या दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन झाले मात्र हे काम दर्जेदार व्हावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव शहर व तालुक्याला कला क्षेत्राचा मोठा सांस्कृतिक वारसा आहे त्या मुळे कोपरगाव शहरातील कलावंतांची गरज ओळखून कोपरगाव नगर पालिकेने एन मोक्याच्या ठिकाणी खुल्या नाट्यगृहाची भव्य वास्तू उभारली होती या ठिकाणी अनेक राज्य स्तरीय कलावंतांनी आपली कला सादर केली व आपल्या कलेचे सादरीकरण केले मात्र गेल्या आठ दहा वर्षांपासून हे नाट्य गृह असून अडचण व नसून खोळंबा असे झाले होते नगर पालिकेने या ठिकाणी घन कचरा वाहतुकीच्या गाड्या उभ्या करण्या बरोबरच अडगळीच्या वस्तू ठेवण्याचे आगार केले होते त्या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने निवेदन देऊन या गाड्या लावण्यास हरकत घेतली होती या नाट्य गृहाच्या दुरावस्थे मुळे या ठिकाणी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते त्या मुळे नाट्य प्रेमीकडून नाट्यगृह दुरुस्तीची मागणी होत होती
नुकतेच या नाट्य गृह दुरुस्तीला ९६ लाखाचा निधी प्राप्त झाला असून श्रेयवादाच्या लढ्यात अखेर उदघाटन देखील पार पडले मात्र नगर पालिकेच्या इतर नित्कृष्ठ कामा सारखे दुरुस्तीचे काम न होता या नाट्य गृहाचे काम दर्जेदार होणे अपेक्षित आहे त्यासाठी नगर पालिकेने तोंड पाहून ठेकेदाराची नेमणूक करण्यापेक्षा ज्याला चांगल्या व दर्जेदार कामाचा अनुभव आहे अशा ठेकेदारांची नेमणूक करावी कारण आगामी नगर पालिका निवडणुकीच्या भाऊ गर्दीत नगर पालिका कर्मचारी व्यस्त असताना या कामाकडे कोणीही लक्ष देणार नाही आणि त्या मुळे एवढा मोठा निधी उपलब्ध होऊन देखील काम नित्कृष्ठ झाल्यास नाट्य प्रेमींची पदरी निराशा पडेल त्यामुळे उच्च दर्जाच्या ठेकेदारांची नेमणूक करावी काम सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी संपूर्ण कामाची निधी व कामाच्या दर्जाची माहिती उपलब्ध करून देणारे सूचना फलक लावावेत असे या पत्रकात म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत