राहुरी(वेबटीम) पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विरोधी धोर...
राहुरी(वेबटीम)
पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विरोधी धोरणां विरोधात सोमवार 22 नोव्हेंबर रोजी राहुरी तहसील समोर वंचित बहुजन आघाडीच्यायावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, तालुका सल्लागार भाऊसाहेब पवार, नवनाथ गजरे, श्री.बर्डे उपस्थित होते.
तर या धरणे आंदोलनास आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे तसेच आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे आदींनी पाठींबा दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत