कोपरगांव/वेबटीम:- कोणत्याही विद्या शाखेची पदवी संपादन करीत असतानाच विद्यार्थ्यांनी उद्योग उभारणी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतः...
कोपरगांव/वेबटीम:-
कोणत्याही विद्या शाखेची पदवी संपादन करीत असतानाच विद्यार्थ्यांनी उद्योग उभारणी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतः मधिल कौशल्ये विकसित करावी. याद्वारे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी मिळेल. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे बना, असा सल्ला कोपरगांव येथिल प्रसिध्द उद्योजक श्री संजय भनसाळी यांनी दिला.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी कला, वाणिज्य व विज्ञान या वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधे उद्योजकता विश्वाची भावना वाढीस लागण्यासाठी व्यवस्थापनाच्या संकल्पनेतुन ‘संजीवनी एन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेल’ (संजीवनी उद्योजकता विकास कक्ष) ची स्थापना करण्यात आली. यावेळी या कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी श्री भनसाळी बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. प्रसंगी शैक्षणिक संचालक श्री डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. एस.बी. दहिकर, कक्षाचे प्रमुख प्रा. रितेश तोंडसे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री भनसाळी पुढे म्हणाले की संजीवनी शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापन विध्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी नवनविन उपक्रमांची अंमलबजावणी करते. याचाच एक भाग म्हणुन उद्योजकता विकास कक्ष स्थापनेचा निर्णय स्वागतार्ह आहे. अशा संकल्पनेतुन निश्चितच भविष्यात उद्योजक निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष स्थानवरून बोलताना श्री सुमित कोल्हे म्हणाले की ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भरपुर टॅलेंट आणि कष्ट करण्याची क्षमता असते, त्यांना दिशा व योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते यशस्वी होवु शकतात, हे संजीवनीच्याच विविध शाखांमधुन बाहेर पडलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी सिध्द केले आहे. या कक्षाच्या निर्मितीमुळे आता विध्यार्थ्यांना भारत व राज्य सरकारच्या उद्योग निर्मिती व तो वाढविण्यासाठी काय योजना आहेत, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, अर्थ सहाय्य कसे उभारावे, इत्यादी अनेक बाबींची माहिती मिळणार आहे. माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांची आपल्या ग्रामिण भागातील विद्यार्थी नोकरदार अथवा उद्योजक कसे होतील ही कायमची तळमळ असते. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे हे सुध्दा विध्यार्थ्यांना स्वतःच्या हिमतीवर उभे करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सदर प्रसंगी विध्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन श्री कोल्हे यांनी दिले.
संजीवनी उद्योजकता विकास कक्ष स्थापनेच्या अगोदर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून विविध उद्योगाच्या कल्पना मागितल्या होत्या. यात १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यातुन सर्वोत्कृष्ट कल्पना असेलेल्या विध्यार्थ्यांना तीन पारीतोषीकांनी गौरविण्यात आले. उद्घाटन प्रसंगी या विद्यार्थ्यांनी पावर पाॅईंट सादरीकरणातुन आपल्या संकल्पना मांडल्या. यात बी.बी.ए. मधिल आंचल नारंग हिला तिच्या आकर्षक केक्स आणि पौष्टीक बेकरी पदार्थ सकल्पनेबध्दल प्रथम, द्वीतिय वर्ष विज्ञान शाखेतील कल्याणी ठोंबरे हिला तिच्या प्रदुषण विरहित सोया पणती संकल्पनेबध्दल द्वीतिय व पुणम होन व मोनाली सोनवणे यांना त्यांच्या अनुक्रमे सुगंधी उटणे व हर्बल फेस मास्क या संकल्पनांबध्दल तृतिय क्रमांकाने गौरविण्यात आले. तसेच नम्रता देवकर, संस्कुती मोरे, तेजस्वीनी गायकवाड आणि श्रध्दा धाडीवाल यांनाही उत्तेजनार्थ बक्षिसांनी गौरविण्यात आले. तसेच प्रा. मुकूल बरवंट, प्रा. विजय सोमासे व प्रा. निलेश भालेराव यांना इन्स्टिट्यूशनल इनोव्हेशन कौन्सिल मार्फत इनोव्हेशन अम्बॅसॅडर हा एक महिण्याचा कोर्स पुर्ण केल्याबध्दत तर भारत सरकारच्या वतीने नॅशनल सायन्स अँड टेक्नाॅलाॅजी एन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट बोर्ड मार्फत एक महिन्याचे प्रशिक्षण पुर्ण केल्याबध्दल डाॅ. सरीता भुतडा व डाॅ. मुक्ता शिंदे यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. पलक मखिजा तर प्रा. लिना मंटाला यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत