माझी मुलगी मला द्या.. तरच मी उपोषण सोडते - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माझी मुलगी मला द्या.. तरच मी उपोषण सोडते

राहुरी(वेबटीम) राहुरी पोलिस ठाणे हद्दीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. सदर घटने बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले. मात...

राहुरी(वेबटीम)

राहुरी पोलिस ठाणे हद्दीतून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. सदर घटने बाबत पोलिसात गुन्हा दाखल करून तीन महिने झाले. मात्र अद्याप सदर मुलीचा काही तपास लागला नाही. त्या मुलीचे आई वडील पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारत आहेत. आज २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. तर जोपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. असा पवित्रा मुलीच्या आई वडीलांनी घेतला आहे. 

      दिनांक ५ ऑगस्ट रोजी ११ वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करून तिला पळवून नेले. याबाबत त्या मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी संतोष बाबासाहेब हारदे राहणार कानडगाव ता. राहुरी. या तरूणा विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर घटनेला तीन महिने उलटून गेले. मात्र अद्याप त्या मुलीचा शोध घेण्यास राहुरी पोलिस असमर्थ ठरत आहे. त्या मुलीचे वडील अपंग व आई अशिक्षित आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते राहुरी पोलिस ठाण्यात हेलपाटे मारत आहेत. हेलपाटे मारून वैतागलेल्या आई बापाने अखेर आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्याशी संपर्क करून त्यांची व्यथा सांगितली. विलास साळवे यांनी संबंधित घटनेच्या तपासी अधिकाऱ्यांना संपर्क केला असता तपास चालू आहे. असे उत्तर मिळाले. 

       तपास चालू होऊन तीन महिने उलटून गेले. माझ्या मुलीचे काही बरेवाईट झाले तर याला कोण जबाबदार राहणार. गोर गरीबांना न्याय मिळतो कि नाही. असा सवाल त्या मुलीच्या आईने केला आहे. पिडीत कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अखेर आरपीआय चे तालूकाध्यक्ष विलास साळवे हे समोर आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुलीचे आई वडीलांनी राहुरी पोलिस ठाण्या समोर आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागत नाहीत. तसेच या घटनेतील आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. असा पवित्रा मुलीच्या आई वडीलांनी घेतला आहे. 


दरम्यान उपोषणकर्ते आई-वडिलांना वंचित बहुजन आघाडी व आरपीआयच्यावतीने पाठींबा देण्यात आला असून जर मुलीचा तातडीने शोध लागला नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडु असा इशारा आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत