देवळाली प्रवरा येथील शहादावल दर्गाचे प्रमुख *आकिल बाबा पटेल यांना 'पीर-ए-तारीकत' खिलापत पदवी बहाल!* - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथील शहादावल दर्गाचे प्रमुख *आकिल बाबा पटेल यांना 'पीर-ए-तारीकत' खिलापत पदवी बहाल!*

देवळाली प्रवरा/वेबटीम:-  भारतातील सुफी संतांचे प्रमुख केंद्र असलेल्या ख्वाजा गरीब नवाज स्थित अजमेर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात डॉ. नज...

देवळाली प्रवरा/वेबटीम:- 


भारतातील सुफी संतांचे प्रमुख केंद्र असलेल्या ख्वाजा गरीब नवाज स्थित अजमेर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात डॉ. नजबुल हसन चिस्ती यांचे हस्ते देवळाली प्रवरा येथिल आकिल बाबा पटेल यांना 'पीर-ए-तरीकत ' खिलापत या पदवीने सन्मानित करण्यात आले.

     इस्लाम धर्मात अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या 'खिलापत' या पदवीने सन्मानित झालेले आकिल बाबा पटेल हे बालपणापासून सुफी संपर्यादाचे अनुयायी आहेत.देवळाली प्रवरा येथील शहादावल या दर्ग्याचे १९९६ साली जीर्णोद्धार करून गेली २५ वर्षे ते सेवा करीत आहेत. या माध्यमातून संपूर्ण राज्यात त्यांचे भक्तगण निर्माण झाले आहेत. गेल्या दोन वर्षा पासून कोरोना च्या रूपाने आलेल्या महामारीच्या काळात अत्यंत पुरातन जडीबुटी पासून अध्यात्म व शास्त्र यांची सांगड घालून निर्माण केलेले कोरोना आजरावरील औषध आकील बाबा पटेल व त्यांचे सहकाऱ्यांनी निर्माण केले.प्रभावी व स्वस्त असणाऱ्या या औषधने  अनेक लोक कोरोना मुक्त झाले.हे औषध कोरोना काळात होणाऱ्या महागड्या उपचारांच्या तुलनेत लोकांना दिलासा देणारे ठरले.

     देवळाली येथील शहादावल बाबा दर्ग्याचा दरवर्षी ५ मे रोजी उर्स असतो यावेळी महाराष्ट्र व राज्याबाहेरूनही अनेक भाविक या ठिकाणी दर्शना साठी येतात.

  समता, बंधुता निर्मिती व दिन दुबळ्यांची सेवा करने ही खिलापत पदवीचे प्रमुख वैशिष्ठ आहेत त्या अनुषंगाने समाजात बंधूभाव, समता व एकता निर्माण करण्यासाठी व सर्व समाजातील दिन दुबळ्या लोकांची सेवा करण्यासाठीच पुढील आयुष्य कामी लावू अशी भावना आकील बाबा पटेल यांनी व्यक्त केली आहे.

   आकील बाबा पटेल यांचे सर्व समाजातून अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत