राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील बारागव नांदूर येथील मौलाना आझाद सोशल संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. गावामध्ये स्वच्छ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील बारागव नांदूर येथील मौलाना आझाद सोशल संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आला. रक्तदान शिबीरामध्ये सुमारे 50 जणांनी रक्तदान करून रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प पूर्ण केला.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील मौलाना आझाद सोशल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रईस इनामदार यांच्या मार्गदर्शनात शेकडो तरूणांनी एकत्र येत गावामध्ये सामाजिक उपक्रम हाती घेतला. संपूर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान हाती घेण्यात आला. कोरोना कालखंडानंतर सर्वत्र निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा पाहता तरूणांनी रक्तदानाचा संकल्प व्यक्त केला. लॅब चालक डॉ. लक्ष्मण गाडे व नगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटल यांच्या रक्तपेढीकडून शिबीर घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराजे पवार होते. मौलाना आझाद सोशल संस्थेने सर्व धर्मसमभाव ही भावना जोपासली आहे. संपूर्ण गावाला मौलाना आझाद संस्थेच्या कार्याचे अभिमान असल्याचे पवार यांनी सांगितले. मच्छिंद्र गाडे, उपसरपंच प्रा. इजाज सय्यद, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गाडे, डॉ. तनवीर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
>यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे, सरपंच निवृत्ती देशमुख, विश्वास पवार, किशोर कोहकडे, योगेश गाडे, बाळासाहेब पवार, ग्रामसेवक गोसावी, डॉ. राजेंद्र गुंजाळ, डॉ. महेश कोहकडे, डॉ. भळगट, डॉ. सिनारे, अॅड. पंढू तात्या पवार,हमीद ईनामदार, कासम इनामदार, डॉ. वृषाली दहातोंडे, विनोद पवार, चंद्रकांत बर्डे, हिरामण शिंदे, यासिन पिरजादे आदींची उपस्थिती होती. आभार इम्रान देशमुख यांनी मानले.
मौलाना आझाद संस्थेचे फिरोज देशमुख, नसिर शेख, अमजद पठाण, फिरोज शेख, रज्जाक देशमुख, आयाज देशमुख, आरीफ देशमुख, जाकिर पठाण, आमर शेख यांसह अनेकांनी सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत