कोपरगाव/वेबटीम:- श्रेयवादाचा लढाईत अडकलेली विकास कामे अखेर नगर पालिका निवडणुकी पूर्वी समझोता एक्सप्रेस मधून सुसाट वेगाने सुरू झाली असली त...
कोपरगाव/वेबटीम:-
श्रेयवादाचा लढाईत अडकलेली विकास कामे अखेर नगर पालिका निवडणुकी पूर्वी समझोता एक्सप्रेस मधून सुसाट वेगाने सुरू झाली असली तरी विकास कामात उच्चभ्रू उपनगरे व सर्व सामान्य जनता राहत असलेल्या झोपडपट्टी वॉर्ड असा भेदभाव का ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला असल्याचा सवाल लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की गेल्या काही दिवस पासून श्रेय वादाच्या लढाईत कोपरगाव शहराची विकास कामे न्यायालयीन लढाई बंद पडली होती मात्र निवडणुकी पूर्वी शहरातील सत्ता धारी नगर सेवक व लोक प्रिय नगराध्यक्ष यांच्यात आश्चर्यकारक दिलजमाई होऊन समझोता झाला आणि उच्च न्यायालयात गेलेली विकास कामाची लढाई थांबली असून त्या नंतर समझोता एक्सप्रेसने विकास कामात वेग घेतला असल्याचे दिसून येते
विकास कामे होत असताना उच्चभ्रू वस्त्या मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या नित्कृष्ठ काँक्रीटीकरण झालेल्या कामावर डांबरीकरण करण्याचा प्रयोग केला जात आहे तसेच या ठिकाणी विकास कामे करताना पायघड्या टाकल्या जात आहेत याउलट सर्व सामान्य गोर गरीब नागरिक राहत असलेल्या इंदिरा नगर ,१०५ आदी भागात रस्ते,गटारी तसेच स्वच्छते च्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे
याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ आचारी यांच्या हॉस्पिटल समोरील रस्ता एक सोडून दोन वेळा केला जातो याउलट एस जी विद्यालय ते मावळा चौफुली रस्ता व हनुमान मंदिर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत या परिसरात वेळेवर कोणतीही स्वच्छता होत नाही यावरून कोपरगाव नगर पालिके कडून उच्च भ्रू वस्त्या व झोपडपट्टी विभाग यांच्या मध्ये विकास कामे करताना दुजाभाव होत असल्याने या भागातील गोरगरीब जनतेला देखील रस्ते, पाणी,स्वच्छता अशा नागरी सुविधा पुरवाव्यात असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत