राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील गुंजाळ नाका परिसरात वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळला असता त्या महिलेकडे असलेल्या ओळख पत्रावरून त...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील गुंजाळ नाका परिसरात वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळला असता त्या महिलेकडे असलेल्या ओळख पत्रावरून ती महिला राहुरी बु. येथील असल्याचे समोर आले आहे. तरी तिच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आज सकाळी गुंजाळ नाका येथे मळीच्या गटारात व वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या मृत महिलेचे जेष्ठ नागरिक ओळख पत्र व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्ड मिळून आले असून त्यावर हातनेवाली प्रभू चव्हाण राहणार राहुरी बु.तालुका राहुरी याप्रमाणे उल्लेख आहे.
तरी या वयोवृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत