सात्रळ(वेबटीम):- येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञा...
सात्रळ(वेबटीम):-
येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख सहाय्यक प्रा. निलेश संपत कान्हे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे."स्टडीज ऑन स्ट्रक्चर प्रॉपर्टी कोरिलेशन ऑफ मॅग्नेटिक नॅनोपार्टिकल्स सिंथेसाइजड बाय गॅस फेज कंडेन्सेशन" या विषयाचा शोधप्रबंध प्रा. निलेश कान्हे यांनी पुणे विद्यापीठास सादर केला होता. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे येथील भौतिकशास्त्र विभागातील प्लाझ्मा लॅबचे प्रो. (डॉ.) विकास मठे व प्रो.(डॉ.) सुधा भोरास्कर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थीप्रिय प्रा. कान्हे यांचे सत्तावीस संशोधनपर लेख विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत. पुणे विद्यापीठांमधील भौतिकशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरणासाठी त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला असून मुंबई येथील भाभा अनुसंधान केंद्र यांची ज्युनियर रिसर्च फेलोशिपही प्राप्त झालेली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री व विधानसभा सदस्य मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री. भारत घोगरे, शिक्षण संचालक श्री. विजय आहेर, महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रो. (डाॅ.) सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, लोणी येथील विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रदीप दिघे,प्रो. (डॉ.) नितीन साळी, प्रो. (डॉ.) श्रीकांत कुचेकर, प्रो. विक्रम भालेकर, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत