सत्य शोधक अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा समझोता एक्सप्रेसच्या दृष्टीपथात नाही का ?:- अँड.नितीन पोळ मा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सत्य शोधक अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा समझोता एक्सप्रेसच्या दृष्टीपथात नाही का ?:- अँड.नितीन पोळ मा

  कोपरगाव/वेबटीम:- मागील साधारण दहा ते बारा वर्षांपासून कोपरगाव शहरात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ही सर्व समाज बां...

 कोपरगाव/वेबटीम:-

मागील साधारण दहा ते बारा वर्षांपासून कोपरगाव शहरात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ही सर्व समाज बांधवांची मागणी आहे मात्र एकमेकांवर कुरघोडी व आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असलेले राजकीय नेते विकासापेक्षा कमिशनचा मलिदा आपल्या हातातून  जाऊ नये या उदात्त हेतूने निवडणुकी पूर्वी गळ्यात गळे घालून विकास कामाच्या नावाने गळे काढून समझोता करतात मात्र दुर्दैवाने या समझोता एक्सप्रेसच्या दुष्टीपथात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा दिसत नाही हे मातंग समाज बांधवांचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल

कोपरगाव शहरात छ शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पूर्णाकृती पुतळे उभे राहिले अण्णा भाऊ साठे यांचा देखील पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी समाज बांधवांनी केली त्याला आता पंधरा वर्षे होतील मात्र पुतळ्याच्या मंजुरी नंतर अनेक अडचणी आल्या मात्र त्या सोडवण्यासाठी वेळोवेळी विविध समाज बांधवांनी पाठपुरावा केला 

गेल्या चार पाच वर्षांपासून पूर्णाकृती पुतळा तयार आहे, सर्व तांत्रिक मंजुऱ्या मिळून स्मारकाचे काम चार पाच महिन्यापासुन पूर्ण झाले आहे अशात एक ऑगस्ट रोजी पुतळा कोपरगाव शहरात आणण्याचे निश्चित झाले होते मात्र त्या काळात विकासाची समझोता एक्सप्रेस आडून बसली होती त्यमुळे कोणती ना कोणती अडचण येत होती मात्र विकासाच्या प्रश्नावर एक होणाऱ्या नेत्यांना नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर मतभेद विसरून सर्व आलबेल होत असताना आजून तरी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा समझोता एक्सप्रेसच्या  दृष्टीपथात दिसत नाही हा समाज बांधवांच्या भावनेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असेच वाटत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत