राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील अहमदनगर जिल्हा बँक शाखेच्या इमारतीचा कर्मचारी रहिवासी असलेल्या पडविचा कठडा कोसळून वित्तहानी झ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील अहमदनगर जिल्हा बँक शाखेच्या इमारतीचा कर्मचारी रहिवासी असलेल्या पडविचा कठडा कोसळून वित्तहानी झाली असून कोणालाही दुखापत झाली नाही.
फॅक्टरी येथे जिल्हा बँकेची शाखा असून या शाखेची भव्य बिल्डींग असून दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर बँकेचे कर्मचारी वास्तव्यास आहे. ही बिल्डींग जीर्ण अवस्थेत आहे. रात्री ८ वाजता इमारतीच्या मागील बाजूचा पडवीचा कठडा अचानक कोसळला. यामुळे मोठा आवाज झाला.
त्यामुळे कॉलनी परिसरातील नागरिकांनी आवाज ऐकून मोठी गर्दी केली. या घटनेत मोठी वित्तहाणी झाली आहे. मात्र कुठलीही दुखापत न झाल्याने सर्वांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत