देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथे सलग तीन महिने धार्मिक भक्तीमय वातावरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथे सलग तीन महिने धार्मिक भक्तीमय वातावरण

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे:-      देवळाली प्रवरा नगर पालिकेची  जानेवारीमध्ये सार्वञिक निवडणूक होणार असली तरी त्या पुर्वीच सलग तीन महिने द...

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे:-

  
  देवळाली प्रवरा नगर पालिकेची  जानेवारीमध्ये सार्वञिक निवडणूक होणार असली तरी त्या पुर्वीच सलग तीन महिने देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथे भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे. सालाबाद प्रमाणे  साईप्रतिष्ठनच्या वतीने साईचरिञ व किर्तन महोत्सव तर राहुरी फँक्टरी येथे शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने किर्तन महोत्सव तर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन महोत्सव आयोजित केल्याने देवळाली प्रवरासह राहुरी फँक्टरी भक्तीमय वातारण निर्माण करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का?असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.

                देवळाली प्रवरा नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या  वाढदिवसानिमित्त सत्यजित कदम फाउंडेशन च्या वतीने 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर रोजी भव्य किर्तन महोत्सव आयोजित केला आहे.02 डिसेंबर रोजी आळंदी येथिल

ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, 03 डिसेंबर  रोजी मालेगाव येथिल ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव, 4 डिसेंबर रोजी गेवराई येथिल ह.भ.प. आकृर महाराज साखरे, 5 डिसेंबर रोजी मुंबई येथिल  ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील, आदींचे रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन होणार आहे.तर 6 डिसेंबर  रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. 2 डिसेंबर रोजी माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त शहरातून सायंकाळी 4 ते 6 यावेळेत  मिरवणूक होणार आहे. त्याच प्रमाणे दररोज 4 ते 6 यावेळेत पोपटराव पवार, मनालीताई सप्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

             सालाबाद प्रमाणे 1 जानेवारी 2022 पासुन साई प्रतिष्ठानच्या वतीने साईचरीञ पारायण व किर्तन महोत्सव आयोजित केला जातो. साई प्रतिष्ठान मध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत.साई प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात राजकारण बाजुला ठेवून कार्यकर्ते एक दिलाने काम करतात. परंतू यावेळी माञ नगर पालिकेची निवडणूक जानेवारी 2022 मध्ये होवू घातली आहे.निवडणूक व पारायण सोहळा, किर्तन महोत्सव  एकाच वेळी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांची अडचण ठरणार आहे.साई पारायण हा राजकारणा विरहित होणारा धार्मिक कार्यक्रम आहे.असे असताना निवडणूकीचे पडघम वाजल्या नंतर कार्यकर्त्यांच्या अंगात आल्या शिवाय राहत नाही. स्थानिक निवडणूक म्हटले की हेवेदावे निघतात साई प्रतिष्ठानच्या साई पारायणात राजकारण बाजुला  ठेवून धार्मिक कार्यक्रम साजरा करावा अशी देवळाली करांची मागणी आहे.

             राहुरी फँक्टरी येथे शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त सर्व धर्म समभाव व सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकञ येवून किर्तन महोत्सव साजरा केला जातो.शिवबा प्रतिष्ठानचे प्रमुख विद्यमान नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो.या ही ठिकाणी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवून किर्तन महोत्सव साजरा होत असल्याने त्याची रंगत निर्माण होते. या कार्यक्रमा दरम्यान समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देवून सन्मान केला जातो.हा कार्यक्रम 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान घेतला जातो.

              देवळाली प्रवरा नगर पालिकेची पंचवार्षिक निवडणूक जानेवारी 2022 मध्ये होणार असल्याचे बोलले जाते. 4 डिसेंबर पासुन 19 फेब्रुवारी पर्यंत विविध टप्प्यात धार्मिक कार्यक्रमाची रेलचल होणार असल्याने सलग तीन महिणे देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी परीसरात धार्मिक भक्तीमय वातावरण राहणार आहे. धार्मिक कार्यक्रमामागे भक्तीमय वातारण निर्माण करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का?असा प्रश्न विरोधकांना विरोधक करीत आहे.धार्मिकतेच्या नावाखाली राजकीय पोळी भाजली जावू शकते.शिवबा प्रतिष्ठानचा कार्यक्रम निवडणूकी नंतर येतो.सध्या डिसेंबर व जानेवारीत होणारे कार्यक्रम राजकीय स्वार्थ पेरीत असु नये अशी चर्चा स्थानिक नागरीक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत