देवळाली प्रवरा(वेबटीम):- काँग्रेस पक्षाला पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त करण्यासाठी देशाचा कौल असलेली युवा शक्ती काँग्रेसशी जोडून हीच युवकांची...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
काँग्रेस पक्षाला पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त करण्यासाठी देशाचा कौल असलेली युवा शक्ती काँग्रेसशी जोडून हीच युवकांची ताकद अत्यंत प्रतिगामी आणि पक्षपाती निर्माण झालेले नवीन राजकारण नष्ट करण्यासाठी वापरावी असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
देवळाली प्रवरा व परिसरातील ३२ गावांत युवक काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान वेगाने सुरु असून आ. कानडे यांनी देवळाली प्रवरा येथे युवक काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानास भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे सचिव अजय खिलारी , युवक काँग्रेसचे समन्वयक राजेंद्र बोरुडे, दीपक पठारे, कुमार भिंगारे, कुणाल पाटील, उत्तमराव कडू, अविनाश लांडगे, शुभम पाटील, गंगाधर गायकवाड, संजय संसारे, जयेश माळी तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते
पुढे बोलताना आ.कानडे म्हणाले की, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब, प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजि तांबे यांच्या सुचनेप्रमाणे तसेच खा. राहुलजी गांधी यांच्या कल्पनेतून देशभर युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी सुरु आहे. अत्यंत लोकशाही पध्दतीने देशभरातील पदाधिकारी निवडले जावेत ही त्यामागे भावना आहे. त्यामुळे एका बाजुला आपण युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी करत आहोत, तर दुस-या बाजुला युवक काँग्रेसच्या उमेदवारांची निवडणूक घेत आहोत. आपले प्रदेशाध्यक्ष पदाचे उमेदवार, प्रदेश सरचिटणीस पदाचे उमेदवार, जिल्ह्याचे अध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अशी चार मते आपल्याला देता येणार आहेत.
माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, युवक काँग्रेस हा एक महत्वपूर्ण घटक असून आणि त्याची लोकशाही पध्दतीने संपुर्ण देशामध्ये निवडणुक सुरु झालेली आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा पक्ष आहे. म्हणून गावागावातून युवाशक्तीला काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून जोडण्याचे काम यानिमीत्ताने सुरु झाले आहे. आभार युवक काँग्रेस शहराध्यक्ष कुणाल पाटील यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत