राहुरी सायकलिंग क्लबची धाडसी मोहीम यशस्वी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी सायकलिंग क्लबची धाडसी मोहीम यशस्वी

राहुरी(वेबटीम):-   ‘पर्यावरण, आरोग्य आणि साहस’ या त्रिसूत्रीचे ब्रीदवाक्य असलेल्या राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लब तर्फे राहुरी - त्र्यंबकेश...

राहुरी(वेबटीम):-


  ‘पर्यावरण, आरोग्य आणि साहस’ या त्रिसूत्रीचे ब्रीदवाक्य असलेल्या राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लब तर्फे राहुरी - त्र्यंबकेश्वर - राहुरी अशा दोन दिवसीय सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या ३०० कि. मी. पेक्षा जास्त अंतराच्या या मोहिमेत क्लबच्या ११ सदस्यांनी सहभाग नोंदविला. अशी माहिती क्लबचे अध्यक्ष अरुण ताकटे यांनी दिली.


          युवकांमध्ये पर्यावरण संरक्षण व वैयक्तिक आरोग्याबाबत जाणीव निर्माण होऊन सायकलकडे युवक-युवती आकर्षित व्हावेत, यासाठी या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.  या मोहिमेत अध्यक्ष अरुण ताकटे यांच्यासह रमेश नालकर विकास अधिकारी एलआयसी, गोरक्षनाथ मेहेत्रे, कडूबा इंगळे, लेफ्ट. डॉ. सुनिल फुलसावंगे सुरक्षा अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इंजि. रवींद्र मोरे (सिमेन्स इंडिया), जयंत जाधव, शुभम हिंगे, बाळासाहेब राऊत, सुनिल शिंदे, आरिफ इनामदार समादेशक अधिकारी होमगार्ड पथक, राहुरी यांनी  उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.  सदर मोहिमेस शनिवार दि. २७ नोव्हें. रोजी पहाटे ०४.१५ वा. राहुरी येथून सुरुवात करण्यात आली. 



राहुरी – लोणी- तळेगाव दिघे – नांदूर शिंगोटे – सिन्नर मार्गे नाशिक येथे दुपारी ०१.०० वाजता सायकल स्वार पोहचले.  त्यावेळी नाशिक सायकलिंग फौंडेशनचे उपाध्यक्ष किशोर माने, सचिव डॉ. मनिषा रौंदळ, रविंद्र दुसाने, नलिनी कड, मोहन देसाई, जाकीरभाई पठाण, इ. पदाधिकाऱ्यांनी तसेच उद्योजक संजय सोमवंशी यांनी स्वागत व सत्कार करून पुढील मोहिमेस व वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर १५२ कि.मी. चा प्रवास करून सायकलस्वार त्र्यंबकेश्वर येथे पोहचले. 


          त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम करून सायकल स्वार रविवार दि. २८ नोव्हें. रोजी ०५.१० वा. निघून सायंकाळी ०५.१५ वा. १५२ कि.मी. चा प्रवास करून राहुरी येथे पोहोचले.


          मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल क्लबचे सदस्य विलास तरवडे, शरद बाचकर, डॉ. अंगराज पवार, प्रीतम बोरा, ओंकार दरक, दिपक मेहेत्रे, ज्ञानेश्वर पोपळघट, अनिल निकम, निखील भोसले, नितीन शहाणे, प्रदीप तनपुरे, सोन्याबापू जगधने, गिरीश सुराणा, भारत टेमक, बंटी हरिश्चंद्रे आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत