देवळाली/वेबटीम:- देवळाली प्रवरा मध्ये आठवडे बाजार सुरू करावा अन्यथा पालिकेवर २० नोव्हेंबर रोजी गेटबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआय आ...
देवळाली/वेबटीम:-
देवळाली नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले की, देवळाली प्रवरा शहरात लॉकडाऊन पासून नागरिक जीवनआवश्यक वस्तू त्यांची नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.
त्यांचं बरोबर देवळाली प्रवरा शहरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले आहे. शहरातील महाविद्यालय शाळा सिनेमागृह तसेच वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी मिळत असून आठवडे बाजार यासाठी परवानगी मिळत नाही. १३ नोव्हेंबर रोजी नागरिक व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते नगरपरिषद कार्यालय समोर धरणे आंदोलनाला बसले होते नगरपरिषदेने आंदोलकांना आंदोलन थांबवण्यासाठी आपल्या कार्यालयाकडून पत्र आंदोलन काम दिले आहे.
तरी आपल्या कार्यालयातून वारंवार विनंती करूनही कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नाही म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांकडून शनिवार २० नोव्हेंबर रोजीसकाळी 11 वाजता देवळाली प्रवरा नगर परिषद कार्यालयाचे गेट बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे.
या निवेदनावर या निवेदनावर कुमार भिंगारे, अंबादास इरले, माऊली भागवत, संजय संसारे, किशोर पंडित, गंगाधर गायकवाड, सचिन घोरपडे, प्रेम गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत