नगर विशेष प्रतिनिधी-: . १६/१०/ २१ रोजी नवरात्र उत्सव असल्याने राशीन येथील जगदंबा देवी ची भव्य पालखी मिरवणूक होती. सदर मिरवणूक चालू असताना रा...
नगर विशेष प्रतिनिधी-:
. १६/१०/ २१ रोजी नवरात्र उत्सव असल्याने राशीन येथील जगदंबा देवी ची भव्य पालखी मिरवणूक होती. सदर मिरवणूक चालू असताना रात्री १०:३० वा. सुमारास जगदंबा देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सतीश सहदेव भांडवलकर हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत घरासमोर दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेत अनोळखी इसमाने त्यांचे आईचे गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र हिसकावून बळजबरीने चोरून स्विफ्ट गाडी नंबर एम एच ०३ बी सी ०४७२ ही मध्ये बसून पळून जात असताना सदर ठिकाणी बंदोबस्त करता असलेले पोलीस अंमलदार यांनी त्याचा मोठ्या शिताफीने पाठलाग करून गाडी थांबवली असता सदर गाडी चालक गाडी सोडून गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. कर्जत पोलिस स्टेशनला सतीश भांडवलकर यांच्या फिर्यादीवरून सदर गाडी चालक विरुद्ध मनी मंगळसूत्र चोरले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सातपुते हे करत असताना सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हे बीड गांधीनगर येथील असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेऊन आरोपी नामे १) बाळू इंद्रजीत बरसाले, २९ वर्षे, राहणार पांगरबावडी तेलगाव रोड बीड यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक केली आहे. त्याची मा न्यायालयाने ८दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली असून त्याचे इतर दोन साथीदार अटक करणे आहे .सदर आरोपीकडून आणखी इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार तुळशीदास सातपुते करत आहेत.
सदरची कारवाई-
मा.पोलीस अधिक्षकसो श्री.मनोज पाटील अहमदनगर जिल्हा , अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल , कर्जत उप विभागीय पोलीस उपअधीक्षक श्री आण्णासाहेब जाधव
यांचे मार्गदर्शनाखाली
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सतीश गावित, सुरेश माने, पोलीस अंमलदार, तुळशीराम सातपुते, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, भाऊ काळे, राणी व्यवहारे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत