राहुरी(वेबटीम):- ताहाराबाद येथील श्री क्षेत्र संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र रावसाहेब साबळे यांची निवड झ...
राहुरी(वेबटीम):-
ताहाराबाद येथील श्री क्षेत्र संत महिपती महाराज देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र रावसाहेब साबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपूर्वी राजेंद्र साबळे यांची ताहाराबाद देवस्थान अध्यक्षपदी राजेंद्र साबळे यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल श्री. साबळे व इतर विश्वस्त यांचा माजी मंञी शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी येथील मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या कार्यालयात सन्मान केला.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आसाराम ढुस, उत्तमराव म्हसे, किशोर वने, मच्छीन्द्र कोहकडे, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवींद्र म्हसे, भाजप राहुरी शहराध्यक्ष राजेंद्र उंडे, बाबासाहेब वाळुंज, बाळासाहेब मुसमाडे, नयन शिंगी, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते , संत महिपती महाराज देवस्थान विश्वस्त उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत