कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरात गतिमान विकासकामे करण्यासाठी आणि नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी पालिका हद्दीतील मालमत्ताधारकांनी वेळेत कर भर...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरात गतिमान विकासकामे करण्यासाठी आणि नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी पालिका हद्दीतील मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरणे गरजेचे असते. परंतु, सद्यस्थितीत थकीत व चालू वर्षाची घरपट्टी ६.१९ कोटी आणि नळपट्टी ६.४९ कोटी रुपये बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर कर भरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, कोपरगाव पालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी, नळपट्टी व गाळाभाडेपोटी घरपट्टी थकीत ३.२१ व चालू वर्षाची २.९८ अशी ६.१९ कोटी रुपये आणि नळपट्टी थकीत ३.७६ व चालू वर्षाची २.७३ अशी ६.४९ कोटी रुपये येणे बाकी आहे. यातील काही मालमत्ताधारकांनी कार्यालयात जमा केलेली आहे. मात्र, अद्याप अनेक नागरिक बाकी आहेत. त्यांनी लवकरात लवकर पालिकेत भरून सहकार्य करावे आणि नोटीस व कडक कारवाईपासून सुटका करावी असे आवाहन मुख्याधिकारी शांताराम गोसावी, कर निरीक्षक पल्लवी सूर्यवंशी यांसह पालिका प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत