कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाट पाण्यावर हक्क सांगायचा असेल व पाणी मिळणार असेलच तर शेतकऱ्यांच्या वतीने हमी घेऊन दोन्ही...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाट पाण्यावर हक्क सांगायचा असेल व पाणी मिळणार असेलच तर शेतकऱ्यांच्या वतीने हमी घेऊन दोन्ही साखर कारखाने व बाजार समितीने पाणी अर्ज भरावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँइ.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या प्रसिद्ध पत्रकात पोळ पुढे म्हणाले की तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे तालुक्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे तालुक्यातून गोदावरी डावा व उजवा कालवा गेला मात्र शेतकरी पूर्वीसारखे पाणी मागणी अर्ज करत नाहीत त्यामुळे डोळ्या देखत जायकवाडी धरणात पाणी निघून जाते पाणी मागणी अर्ज न भरल्या मुळे पाणी उपलब्ध असून शेतीला पाणी मिळत नाही
कोपरगाव तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत ज्या शेतकऱ्यांनी ऊस नोंदणी केली त्यांचे पाणी अर्ज साखर कारखाण्याने भरून घ्यावेत तर जे शेतकरी रब्बी चे पीक घेतात व ज्यांनी पीक कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांचे पाणी अर्ज संबंधित कर्ज पुरवठा करणाऱ्या सोसायटी व जिल्हा बँकेने भरल्यास शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळेल व कर्ज फेडीच्या वेळेस वसुली देखील होईल मात्र पाणी अर्ज नक्की मिळणार असेल तर साखर कारखाने व जिल्हा बँकेने नियोजन केल्यास अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल त्यामुळे जेष्ठ नेते व संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन मा बिपीन दादा कोल्हे,कर्मवीर शंकरराव जी काळे कारखाण्याचे चेअरमन व आ आशुतोष काळे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, यांनी नियोजन करावे या पूर्वी जेष्ठ नेते माजी खा कै शंकररावजी काळे साहेब व माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब या सुरू केलेल्या हक्काच्या पाणी आंदोलनाला गतिमान करावे असे या पत्रकात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत