शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ताईंसोबत दीपोत्सव साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ताईंसोबत दीपोत्सव साजरा

आंबी(वेबटीम) श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर तालुक्यातील नऊ केंद्रांमध्ये दिवाळीनि...

आंबी(वेबटीम)

श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर तालुक्यातील नऊ केंद्रांमध्ये दिवाळीनिमित्ताने 'दीपोत्सव आनंदाचा' उपक्रम साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेलापूर खुर्द येथील पुजारी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माध्यन्य भोजन योजणे अंतर्गत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ताईंचा गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्या हस्ते साडी-चोळी व फराळ देऊन कृतज्ञता सोहळा करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी येथील माध्यन्य भोजन शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस या दोन महिलांच्या पतींचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

    सोहळ्याला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी सामलेटी म्हणाल्या की, दीपोत्सव आनंदाचा हा उपक्रम आनंद द्विगुणित करणारा आहे. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या ताई ज्या मायेने, आपुलकीने अन्न शिजवतात, त्या हातांचे ऋण फिटता फिटणार नाही. त्यांच्याकडून ज्या निर्व्याज मनाने काम केले जाते त्या मनांची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आईच्या मायेने खाऊ घालणाऱ्या त्या माऊलींना सलाम करावा वाटतो. शिक्षकांना ज्यांचा नितांत आदर वाटतो त्या ताईंचा, मावशींचा, आजींचा दीपोत्सव आनंदाचा उपक्रमाद्वारे गौरव केला जात आहे. या उपक्रमाद्वारे अशा ताईंना दीपावली निमित्त आम्ही आमच्या आनंदात सहभागी करून घेऊ इच्छित आहे.

     गटशिक्षणाधिकारी सामलेटी यांच्या या आवाहनास श्रीरामपूर तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सदर उपक्रमास पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी नऊ केंद्रांमधील शाळांची निवड करून शालेय पोषण आहार शिकवणाऱ्या ताईंचा सन्मान सोहळा साजरा केला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दिव्यांग बालकांना यावेळी वस्तू रूपाने शिक्षक व शिक्षण विभागाच्या प्रशासनाकडून मदत करण्यात आली. सदर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत