कोपरगांव - प्रतिनिधी विरोधकांच्या तोंडी कोल्हेंचे अस्तित्व संपल्याची भाषा शोभत नाही आणि त्यांची लायकी देखील नाही असे प्रतिपादन भाजपा युवा मो...
कोपरगांव - प्रतिनिधी
विरोधकांच्या तोंडी कोल्हेंचे अस्तित्व संपल्याची भाषा शोभत नाही आणि त्यांची लायकी देखील नाही असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ साठे यांनी केले.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोल्हे घराण्याबददल बाळबुध्दींने आरोप करणाऱ्यांचे चारित्र किती शुद्ध आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी शहराच्या बिकट झालेल्या पाणी प्रश्नाची सोडवणुक करण्यांसाठी पालिकेची सांपत्तीक स्थिती चांगली नसतांनाही येसगांव शिवारात साठवण तलावासाठी कोटयावधी रूपयांच्या जमिनी मिळवुन देत कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, वाढत्या लोसंख्येमुळे आता हे पाणी पुरत नाही. तळ्यातील गाळ काढण्यासाठी सौ स्नेहलता कोल्हे यांनी विशेष मोहीम राबवली. सध्याचे लोकप्रतिनिधी व त्यांचे बगलबच्चे पाचव्या साठवण तळयाची जी मखलाशी मारत आहे ती जमीन देखील माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनीच मिळवून दिली आहे आणि ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना संजीवनी सहकारी साखर कारखान्यांत नोकरी देवुन त्यांचे पुर्नवसन केले आहे याउलट विरोधकांची कुठली मुर्दुमकी गाजवली आहे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगंव शहरवासियांच्या भल्यासाठीच ४२ कोटी रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्याचे काम मार्गी लावले त्यास वाढीव लागणारा साडेसात कोटी रूपयांचा निधी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासनाकडुन मिळविला. दुष्काळात संजिवनी कारखान्याचे प्लांट बंद ठेवून कोपरगाव श हर वासियांना पाण्याचे टँकर पुरवले, येसगाव ग्रामपंचयतीतर्फे शहराला पाणी पुरवठा केला.
कोपरगांव शहराचे वैभवात भर घालणारे सुसज्ज बसस्थानक, पोलिस कार्यालय इमारत, नगरपालिका कार्यालय इमारत, अग्निशमन इमारत, पंचायत समितीची इमारत, सुसज्य ग्रंथालय, यासह शहरातील रस्ते, गटारी, पाणी, आरोग्य, वीज आदि विकास कामांसाठी कोटयावधी रूपयांचा विकासनिधी शासनाकडुन मिळवुन देत असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या, विस्थापीत टपरीधारकांचा प्रश्न सोडविण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासुन थेट नगरविकास मंत्री यांच्यापर्यंत बैठका घेत त्याची कड लावण्यांसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले, वाढते शहरीकरन आणि उपनगरांमध्ये कोपरगाव शहरवासीयांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी निळवंडे शिर्डी कोपरगाव २६० कोटी रुपये खर्चाची बंदिस्त पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन योजना मंजूर करून आणली, याशिवाय मंत्रालय स्तरावर शहर विकासाचे अनेक प्रस्ताव दिले, हे सगळ काम विरोधक आणि त्यांचे समर्थक नाकारत आहेत. तेंव्हा टिकाकर्त्यांनी अगोदर कोल्हे यांच्या शहर विकासाचा आलेख पडताळून पहावा नंतरच टिका टिप्पणी करावी आणि ज्यांची लायकी नाही त्यांनी यावर भाष्य करू नये असेही शेवटी साठे म्हणाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत