कोपरगाव प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला असून कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने श्...
कोपरगाव प्रतिनिधी -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला असून कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाण यांच्या सहकार्याने युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये राबविलेल्या 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत आयोजित केलेले सर्वरोग निदान शिबिर आदर्श उपक्रम असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत आयोजित सर्वरोग निदान शिबिराला आ. आशुतोष काळे यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,कोरोना महामारीमुळे आरोग्याच्या बाबतीत सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक कुठल्याही आजाराच्या तपासणीसाठी मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन आजाराचे निदान करू शकत नाही. भविष्यात हेच आजार रौद्र रुप धारण करू शकतात त्यासाठी कोणत्याही आजाराचे वेळेत निदान होऊन त्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते. अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी ही आरोग्य शिबिरे महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेले सर्व रोग निदान शिबीर हा आदर्श व कौतुकास्पद उपक्रम असून अशा शिबीरांचा नागरिकांनी लाभ घेऊन आपले आरोग्य अबाधित ठेवावे असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, कृष्णा आढाव, फकीरमामु कुरेशी, रमेश गवळी, जावेद शेख, धनंजय कहार, अशोक आव्हाटे, कार्तिक सरदार, राजेंद्र आभाळे, आकाश डागा, विकास बेंद्रे, सागर लकारे, संतोष शेजवळ, इम्तियाज अत्तार, फिरोज पठाण, महेश उदावंत, रिंकेश खडांगळे, ऋतुराज काळे, मुकुंद इंगळे, मतीन चोपदार, जुनेद शेख, इरफान तांबोळी, भोलू शेख, हाजीवहाब कुरेशी, सलिम चमडेवाले, संदीप सावतडकर, अक्षय आंग्रे, साजिद शेख, अमन शेख, अस्लम शेख, अलमत कुरेशी, अमजद शेख, फैजान कुरेशी, सोमनाथ आढाव, संतोष टोरपे, डॉ. दिपक पगारे, डॉ. प्रशांत सगळगिळे, डॉ. दिपक राजगुरू, डॉ. सागर बागडे, डॉ. पुजा कातकडे, डॉ. अनिरुद्ध उबाळे, प्रसाद ठोंबरे, तुषार कोतकर आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत