कोपरगाव/प्रतिनिधी:- गोदातिरी असलेल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमच चर्चेत असतो. शिवाय दिग्गज राजकारणी असूनही गेल्या काही वर्षांपासून हा ...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
गोदातिरी असलेल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमच चर्चेत असतो. शिवाय दिग्गज राजकारणी असूनही गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न सुरू होऊन अद्यापही सुटलेला नाही. मात्र, याकामी लढा देणारे राजेश मंटाला यांनी जनांदोलनाची हाक दिली आहे, त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी सांगितले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून शहर पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित आहे. दिग्गज पुढारी असूनही अद्याप हा प्रश्न तडीस गेलेला नाही. शासन दरबारी देखील पाठपुरावा झालेला आहे. परंतु, येथील दिग्गज राजकारणी फक्त या प्रश्नावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानत आहे. यासाठी नागरिकांनी देखील अनेकदा आवाज उठविला. तरी देखील हा प्रश्न सुटला नाही. आता याकामी लढा देणारे राजेश मंटाला यांनी जनांदोलनाची हाक दिली असून, त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. आज त्यांचा यथोचित सत्कार करून खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभे राहू असा विश्वास शहराध्यक्ष सतीश काकडे, तालुका संघटक रघुनाथ मोहिते, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, हिंदू सम्राट संघटना संस्थापक नीलेश काकडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, विक्रम काकडे आदिंनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत