कोल्हार खुर्द येथील काकडा भजनाची उद्या सांगता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोल्हार खुर्द येथील काकडा भजनाची उद्या सांगता

  कोल्हार(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील (गणेशवाडी) हनुमान मंदिर येथे कै. विष्णुपंत महाराज सावंत यांच्या आशीर्वादाने व ह भ...

 कोल्हार(वेबटीम):-


राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील (गणेशवाडी) हनुमान मंदिर येथे कै. विष्णुपंत महाराज सावंत यांच्या आशीर्वादाने व ह भ प मनोहर महाराज लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विन शुध्द  कोजागिरीपासून सुरूवात व कार्तिक शुध्द कार्तिक पौर्णिमा या पर्वणीला कार्तिकस्नान म्हणून आेळखले जाते.


 वारकरी संप्रदायामध्ये या स्नानाला मानाचे स्थान आहे जवळपास महीनाभर पहाटे ४ते७ पर्यंत रोज नित्यनियम  पहाटेच्या शांत वातावरणात विठ्टल नामाचा गजराने वाड्यावस्तीमध्ये काकडा भजनाचा आंनद मिळतो गेली ४५ वर्षापासून येथील हनुमान मंदिरात सालाबाद प्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो रोज हरीपाठ,यातून मुले गायक,वादक म्हणून तयार झाली आहे अशी माहीती ह,भ प शंकर महाराज लोंखडे यांनी दिली सदर कार्यक्रमाची सांगता कार्तिक पौर्णिमा शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


 यानिमित्त सांयकाळी ६ते८ ह. भ.प. सुनिल महाराज सोनवणे निंभेरेकर यांचे किर्तन होणार आहे. यानंतर ह.भ. प. सुरेश लोखंडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन संत शिरोमणी सावता महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी,भजनी मंडळ,येथील ग्रामस्थांनी  केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत