भाजपात वसंत कदम यांना उज्ज्वल भविष्य- माजी आ. चंद्रशेखर कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भाजपात वसंत कदम यांना उज्ज्वल भविष्य- माजी आ. चंद्रशेखर कदम

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या वसंत कदम यांना भारतीय जनता पार्टीत भविष्य उज्जवल असल्याचे प्रतिप...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-


अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या वसंत कदम यांना भारतीय जनता पार्टीत भविष्य उज्जवल असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले.


वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक तथा भाजप शहराध्यक्ष वसंत कदम यांच्या अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवारी  सायंकाळी वैष्णवी चौक येथे पार पडला. यावेळी माजी आ.कदम बोलत होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, देवळाली सोसायटी चेअरमन राजेंद्र ढुस, आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, सोसायटी माजी चेअरमन शहाजी कदम, शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे, देवळाली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, मराठा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, डॉ.अनंतकुमार शेकोकार, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कराळे ,आण्णासाहेब दोंड,कुंडलिक कदम आदिंसह मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना माजी आमदार कदम म्हणाले की, कमी वयात वसंत कदम यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. नुकतेच देवळाली प्रवरा नगरपालिकेने पर्यावरण दूत म्हणूनही निवड केली आहे. गेल्या वेळेस त्यांना दुर्देवाने खुर्ची मिळाली नाही मात्र यंदा त्यांना नक्कीच खुर्ची भेटलं यासाठी मी साई बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. राजकारण करताना तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो ही गोष्ट अवलंबून वसंतने कुणावर टीका टिप्पणी न करता पक्षाचे कार्य तसेच ५ वर्षे देवळाली नगरपालिकेच्या माध्यमातून झालेला विकास जनतेसमोर मांडावा. वसंत यास भाजपात भविष्य उज्जवल असल्याचे कदम म्हणाले.


यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, शहाजी कदम,विलास साळवे,देवेंद्र लांबे,सुनील कराळे यांनी मनोगत व्यक्त केले.


गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या आमच्या सामाजिक कार्यात सर्वात मोठा वाटा मित्र परिवाराचा आहे. याच सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांन ताकद द्यावी अशा भावना शहराध्यक्ष वसंत कदम यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पत्रकार चेतन कदम तर आभार अध्यक्ष संतोष कराळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व भाजपा पदाधिकारी प्रयत्नशील होते. वसंत कदम यांना दिवसभर सोशल मिडियाच्यामाध्यातून राहुरी फॅक्टरी परिसरातील मित्र परिवार, हितचिंतक, नागरिक यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत