मोकाट फिरणाऱ्या जनावरांना मालकांनी घरीच बांधून ठेवावे : नगराध्यक्ष वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मोकाट फिरणाऱ्या जनावरांना मालकांनी घरीच बांधून ठेवावे : नगराध्यक्ष वहाडणे

  कोपरगाव/प्रतिनिधी:- राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या म...

 कोपरगाव/प्रतिनिधी:-


राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे घरीच बांधून ठेवावी, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.


यबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई येथील कत्तलखान्यामध्ये (स्लॉटर हाऊस) नियमितपणे सरासरी ३ ते ५ म्हैसवर्गीय जनावरे कापली जातात. कोणत्या दिवशी कुणी व किती जनावरे कापली याची नोंदणीही पालिकेकडे होती. आज संजयनगर, बैलबाजार रस्ता भागात जाऊन कसाई व्यावसायिकांची बैठक घेतली.  यात मागील महिन्यात प्रशासनाने ज्याठिकाणी कारवाई केली त्याठिकाणच्या जागा मालकांनीही आम्ही पुन्हा चुकीचे काहीच करणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले. जर कोणी कायदा मोडला तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही त्यांनी स्वतःहून सांगितले. आम्ही काही नियमबाह्य केल्यास आमच्यावर कारवाई करा असेही कसाई व्यावसायिकांनी स्वतःहून सांगितले. आता यानंतरही कुणी गोवंश हत्या करून कायदेभंग केला तर कठोर कारवाई करण्याचे सर्वानुमते ठरले असल्याचे सांगितले. 


त्यामुळे आता तरी शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या गोवंश जनावरांना मालकांनी घरीच बांधून ठेवावे. यामुळे शहरातील कचरा, कॅरीबॅग खाऊन जनावरे आजारी पडणार नाही आणि रहदारीला अडथळाही होणार  नाही असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत