नगर विशेष प्रतिनिधी/बाळासाहेब नवगिरे-: जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळख असणाऱ्या सोनई पोलीस ठाण्याला खमक्या अधिकाऱ्याबरोबरचं कायद्याचे नाॅल...
नगर विशेष प्रतिनिधी/बाळासाहेब नवगिरे-:
जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळख असणाऱ्या सोनई पोलीस ठाण्याला खमक्या अधिकाऱ्याबरोबरचं कायद्याचे नाॅलेज आसणारा पोलीस अधिकारी मिळावा अशी जनसामान्यांची अपेक्षा असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. शुक्रवार दि.२६ रोजी सुरुवातीपासून वादग्रस्त, कायद्याचे नाॅलेज नसणारे अंगी खमक्यापणा नसलेले. सपोनि रामचंद्र कर्पे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कर्पे यांचे कारनामे पाहून तातडीने कंट्रोल जमा केले. उशिरा का होईना कर्पे यांना कंट्रोल जमा केल्याने सर्व सामान्य जनतेबरोबर सामाजिक कार्यकर्ते, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी शोशलमिडीयावर आनंद व्यक्त करुन पेढे वाटून पोलीस पाटील अधिक्षक मनोज पाटील यांचे आभार मानले.
कर्पे सोनई पोलीस चार्ज घेतल्यापासून नेहमीच वादग्रस्त ठरले त्यांच्या कार्यकाळात एकहि तपास पुर्ण झालेला नसून नेहमीच अर्थ पुर्ण हित जोपासण्यासाठी धन्यता मानली.
२९गावांच कार्यक्षेत्र असून ३४कर्मचारी बरोबरच दोन अधिकारी येथे कार्यरत आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांनी कर्पे यांच्या कालखंडात केलेल्या कामाची चौकशी करून काॅल डिटेल्स तपासून अवैध धंदे तसेच नेहमीच आरोपींना पाठीशी घालूण गुन्हेगारी क्षेत्रातील डेरिंग वाढण्याच्या कामाला प्रोत्साहन दिल्याचं उघड होणार आहे.तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी राजरोसपणे पोलीस ठाण्यात नेहमीच उठबसं होतं असायची.
जमिनीचे वाद कसे निर्माण होतील आणि ग्राहकात कसं रुपांतर होईल यासाठी काही कर्मचारी कर्पे यांनी कामाला लावले होते. अर्थ पुर्ण व्यवहार झाला की, फौजदारी,आणि अर्थिक लाभ न झाल्यास दिवाणी असा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची लुट येथे झाली.
सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध धंदे,वाळू तस्करांबाबत कर्पे यांना माहिती दिल्यावर हे महाशय संबंधित यांना संपर्क करुन त्या व्यक्तीची माहिती ह्या गुन्हेगारांना देत असल्याचे येथे प्रकार घडल्याने पुन्हा कर्पे यांना फोन करण्याचं सोडून दिल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगत आहे.
सपोनि रामचंद्र कर्पे यांनी एन सी गुन्हा काहीच कारवाई होत नसल्याचे सांगत फिर्यादीची बोळवण करत असे,मग एक एन सी दाखल करण्यासाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो मग पोलीस प्रशासन एन सी कारवाई करुन वेळ कसाला घालवत असेल असा प्रश्न पडतो.
कर्पे यांचे शिक्षण तपासून पाहणे गरजेचे असून नेमकं पोलीस प्रशासनामध्ये काॅप्या करुन पास झाले का? तपासून पाहणे गरजेचे आहे. सत्ता गेली शहाणपणं गेलं कर्पे बरोबर असणारे पोलीस कर्मचाऱ्यांनी हात वर करून काहीच कळत नव्हत कसकाय अधिकारी झाला आम्हांलाच कळत नाही. अवैध धंद्यावर सुद्धा कारवाई कर्पे करु देत नव्हता अशा एकरी उल्लेख होत आहे. त्यांचा अशा वागण्यामुळे जिल्ह्यात सोनई पोलीस ठाण्याची प्रतिष्ठा मलीन झाली. येथे आता खमक्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कर्पे यांच्या काळात अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले परंतु नियतीने त्यांचावर सुद्धा तीच वेळ आणली शेवटच्या महिन्याचे लक्ष्मीदर्शन कोणाच्या नशिबी
साहेब तुमची इयत्ता कंची कोर्टाचा मनाई हूकुम,जमिनीचा उतारा जर कळत नाही तुम्ही मगं कसे पोलीस अधिकारी झालातं पोलीस बंदोबस्ताचे पैसे भरुन हि संबंधित यांना सहकार्य न करता उलट ट्रॅक्टर, जेसीबी वाले यांना पोलीस कर्मचारी दम देवून हुसकावून दिल्याचे पिडीत शेतकऱ्यांनी सांगितले. अशा वेळी कर्पे तसेच हवालदार लबडे यांचावर कोर्टात कंटम दाखल आसल्याचे कळते.
कर्पे कोणत्या धुंदीत होते. लोकप्रतिनिधी बरोबरच वरिष्ठांच्या आदेशाचे कधीच पालन केले नाही .नेहमीच उडवा उडवीचे उत्तर असायचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत