धकाधकीच्या जीवनात सर्वांगीण विकासासाठी क्रिकेटसारखे खेळ गरजेचे- माजी आ.कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धकाधकीच्या जीवनात सर्वांगीण विकासासाठी क्रिकेटसारखे खेळ गरजेचे- माजी आ.कदम

  देवळाली प्रवरा(वेबटीम):- हल्लीचे युग हे धावपळीचे आहे. तसेच इलेक्ट्रॉनीक साधने करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.  त्यामुळे अनेक...

 देवळाली प्रवरा(वेबटीम):-

हल्लीचे युग हे धावपळीचे आहे. तसेच इलेक्ट्रॉनीक साधने करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.  त्यामुळे अनेकजण मैदानावर खेळायला जाणेच विसरले आहेत. परंतु, त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत.  त्यामुळेच सर्वांगीण विकासासाठी क्रिकेटसारखे खेळ गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले.


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू चॅलेंजर क्रिकेट क्लब व जगदंब प्रतिष्ठान आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन रविवार 28 नोव्हेंबर रोजी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते पार पडले. प्रसंगी ते बोलत होते.


माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक  प्रकाश संसारे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ढुस, माजी चेअरमन सोपानराव शेटे, शहाजी कदम , सचिन कोठुळे, अजीज शेख, दिलीप मुसमाडे अमोल कदम भारत शेटे ,संजय बर्डे , आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, अविनाश मुसमाडे , सुधाकर कदम, सागर खांदे, भाऊसाहेब गडाख, बाबासाहेब वाळुंज, सुदाम भांड ,सचिन सरोदे, भीमराज मुसमाडे, चेतन कदम,  रवी दळवी, गीताराम बर्डे, मंगेश ढुस, राजेंद्र चव्हाण, विवेक लांबे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रकाश संसारे यांनी केले तर आभार आयोजक सचिन कोठुळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत