राहूरी फॅक्टरी(वेबटीम):- येथील रहिवासी तथा प्रसिद्ध शिवचरित्रकार हसनजी सय्यद यांचे शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर रोजी नेवासा तालुक्यातील मुकींदप...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम):-
येथील रहिवासी तथा प्रसिद्ध शिवचरित्रकार हसनजी सय्यद यांचे शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर रोजी नेवासा तालुक्यातील मुकींदपूर येथील श्रीराम साधना आश्रम येथे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कार्तिकी पौर्णिमानिमित्त मुकींदपूर येथील श्रीराम साधना आश्रम येथे शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत व्याख्यान संपन्न होणार आहे.
महंत सुनीलगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आश्रमात व्याख्यान सेवा स्व. पार्वतीबाई रामभाऊ शेळके, बाभूळवेडा यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त संपन्न होणार आहे. या व्याख्यानानंतर सौ.सुनीता व श्री. संदिप गंगाधर ताकपेरे यांच्यावतीने महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी व्याख्यान व महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम सेवा मंडळ व श्रीराम साधना आश्रम यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत