देवळाली प्रवरात स्व. प्रफुल्ल दळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजितरक्तदान शिबीरात ३८ रक्तदात्यांचा सहभाग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात स्व. प्रफुल्ल दळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजितरक्तदान शिबीरात ३८ रक्तदात्यांचा सहभाग

देवळाली प्रवरा(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे मंगळवार दि.१६ नोव्हेंबर रोजी स्व. प्रफुल्ल दळवी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्त...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे मंगळवार दि.१६ नोव्हेंबर रोजी स्व. प्रफुल्ल दळवी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात जवळपास ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.


शहरातील विश्वकर्मा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण रक्तकेंद्र अहमदनगर यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबीरात ३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला.


 या शिबिरास नगराध्यक्ष सत्यजीत कदम, नगरसेवक सचिन ढुस,उद्योजक सतीश वाळुंज, उद्योजक सचिन कोठूळे, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल कराळे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, मोहसीन शेख आदि उपस्थित होते.

रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी सचिन कोठुळे, मंगेश ढुस, रवींद्र दळवी, अक्षय कडू, संजय राऊत, अक्षय गाडेकर, लखन गाडेकर,निलेश राऊत, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.गुप्ता तसेच विश्वकर्मा प्रतिष्ठान व स्व.प्रफुल्ल दळवी मित्र परिवार आदीनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत