सात्रळ/वेबटीम:- राहुरी मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेची अडलेली सरकारी कामांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने तसेच मतदार संघातील मतदारांच्या ...
सात्रळ/वेबटीम:-
राहुरी मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेची अडलेली सरकारी कामांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने तसेच मतदार संघातील मतदारांच्या गाठीभेटी असे उद्धिष्ट ठेऊनच मतदार संघात जनता दरबार भरविण्यात आले आहेत. जनतेची कामे करताना कोणताही दुजाभाव ठेवणार नसून आलेली व्यक्ती कोणत्या पक्ष्याची, कोणत्या गटाची या विचारांना फाटा देऊन फक्त आलेल्या व्यक्तीच्या प्रश्नांची सोडवणूक हीच भावना आहे.
सात्रळ सोनगाव धानोरे आजूबाजूच्या परिसरातील गावांमधील सामान्य जनतेच्या साठी भरविलेल्या जनता दरबारात राज्याचे राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे बोलत होते.
राहुरी मतदारसंघातील महसूल, महावितरण, पंचायत समिती, सिटी सर्वे, पुरवठाविभाग इ. विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित सोनगाव येथे जनता दरबार पार पडला. जनता दरबारात जनतेच्या विविध विषयातील प्रश्नांची सोडवणूक झाल्याने सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
या प्रसंगी प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार शेख, गट विकास अधिकारी खामकर, महावितरणचे सोनावणे , मंडल अधिकारी शिंदे, तलाठी, तसेच पुरवठा निरीक्षक सगभोर मॅडम,ग्रामविकास अधिकारी हैदरभाई पटेल, तसेच मिलिंद अनाप,किरण कडू, गणेश कडू, संजय नागरे, सुभाष डुकरे, सागर डुकरे, रोहित असावा, सूर्यभान शिंदे, अक्षय दिघे, पोपटनाना दिघे, लक्ष्मणराव अंत्रे, लक्ष्मण दिघे, सचिन दिघे, सतिष शिंदे, बापू दिघे, विजय डुकरे परिसरातील नागरिक मोठया संख्येने हजर होते.
जनता दरबाराच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरजकुमार बोकील व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव अंत्रे यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत