देवळाली प्रवरा(वेबटीम):- येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू चॅलेंजर क्रिकेट क्लब व सचिनभाऊ कोठुळे मित्र...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू चॅलेंजर क्रिकेट क्लब व सचिनभाऊ कोठुळे मित्रमंडळाच्यावतीने रविवार २८ नोव्हेंबर ते शनिवार ४ डिसेंबर २०२१ या कालावधीत भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रोड येथील सत्यजित कदम फाउंडेशन कार्यालयाच्या पाठीमागच्या मैदानात रविवार २८ डिसेंबर रोजी या स्पर्धेस प्रारंभ होणार असून उद्घाटन माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस १५ हजार रुपये श्री. सचिनभाऊ कोठुळे, द्वितीय बक्षीस ११ हजार रुपये अविनाशजी मुसमाडे, तृतीय बक्षीस ७ हजार रुपये गोरखजी आडसुरे यांच्याकडून , तृतीय बक्षीस ५ हजार रुपये मनोजजी शिंदे यांच्यावतीने तर मॅन ऑफ द मॅच व अंतिम सामान्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये बक्षीस अक्षय गाडेकर यांच्याकडून देण्यात येणार आहे.तसेच स्व. गनिभाई शेख यांच्या स्मरणार्थ मोहसीन शेख यांच्याकडून बक्षिसे दिली जाणार आहेत.
मैदानासाठी सत्यजित कदम फाऊंडेशन व ग्रामसुधारणा मंडळ, मंडप व साउंड सिस्टीम सौजन्य मंगेश ढुस, डिजेसाठी विवेक लांबे(मोरया ग्रुप), बॅट-बोल-स्टम्प यासाठी स्व.भगवानराव कदम यांचे स्मरणार्थ श्री.संदिप कदम, ट्रॉपीसाठी स्व.प्रफुल्ल बाळासाहेब दळवी यांचे स्मरणार्थ रवी दळवी यांच्याकडून सौजन्य लाभणार आहे. परिसरातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, मित्र मंडळ, ग्रुप तसेच अहमदनगर येथील राऊ बिल्डर्स व डेव्हलपर्सचे युवा उद्योजक रोहित मोहनिराज मुळे यांचे सहकार्य लाभणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी आपली नावनोंदणी तात्काळ काळू बर्डे(7057047728), शुभम बटवाल(7030727490), निलेश राऊत(7620323215), मयुर सुर्यवंशी(7218251580), सुशांत वारुळे(8484842768) , अभिजित शिंदे(7875491869) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिनभाऊ कोठुळे मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत