राहुरी(वेबटीम):- माजी खासदार प्रसाद तनपुरे व त्यांच्या सुविधपत्नी तथा माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ...
राहुरी(वेबटीम):-
माजी खासदार प्रसाद तनपुरे व त्यांच्या सुविधपत्नी तथा माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
काल दुपारी केलेल्या कोरोना चाचणीत माजी खासदार शप्रसाद तनपुरे डॉ. उषाताई तनपुरे हे दोघेही करोना पॉसिटीव्ह आले असल्याची माहिती ना.प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी दिली. त्यांना उपचारासाठी दोघांनाही दवाखान्यात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.
माजी खासदार प्रसाद तनपुरे व सौ. उषाताई तनपुरे यांच्या संपर्कात जे कोणीही आले असल्यास आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत