राहूरी/वेबटीम:- ज्या चित्रपटाची गेल्या दोन वर्षांपासून रसिक पाहत होते तो सूर्यवंशी चित्रपट आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. ...
राहूरी/वेबटीम:-
ज्या चित्रपटाची गेल्या दोन वर्षांपासून रसिक पाहत होते तो सूर्यवंशी चित्रपट आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. गेल्या दोन वर्षापासुन सूर्यवंशीची चर्चा होती. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रमोशनही तेवढ्याच ताकदीनं करण्यात आले होते. त्याला अपेक्षेनुसार प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे. राहुरी फॅक्टरी येथील विठामाधव थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी पहावयास मिळाली. हाऊस फुल्ल झाल्यानंतर अनेकांना नाईलाजाने घरचा मार्ग पत्कारावा लागला.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून पिक्चर थिएटर बंद होते. कोरोनानंतर मोठ्या बॅनरचा सूर्यवंशी हा पहिलाच चित्रपट होतो. जो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. आता परिस्थिती काही अंशी पूर्वपदावर येत असताना अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहे. त्यामध्ये अक्षय कुमारचा सूर्यवंशी देखील आहे. या चित्रपटामध्ये त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. विशेष बाब म्हणजे अक्षय आणि कतरिना हे दोन्ही कलाकार दहा वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचेही दिसून आले.
राहुरी फॅक्टरी येथील विठामाधव थिएटरमध्ये काल मोठी गर्दी अनुभवायला मिळाली. ९ ते १२ च्या शोसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. विठामाधव थिएटर हाऊस फुल झाल्यानंतर नाइलाजाने अनेकांना घरचा रस्ता बघावा लागला. काल या ठिकाणी जत्रेचे स्वरूप अनुभवायला मिळाले. आज शनिवार व उद्या रविवारीही त्याचप्रमाणे गर्दी राहणार असल्याचा विश्वास विठामाधव थिएटरचे सर्वेसर्वा जयेश मुसमाडे यांनी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत