कोपरगावमध्ये छत्रपती स्मारकात दीपोत्सव उत्साहात साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावमध्ये छत्रपती स्मारकात दीपोत्सव उत्साहात साजरा

कोपरगाव/प्रतिनिधी:- येथील 'शिवजागर एक विचारधारा' यांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज स...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


येथील 'शिवजागर एक विचारधारा' यांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दीपावलीनिमित दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी 'एक दिवा राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, एक दिवा छत्रपती शिवाजी महाराज, एक दिवा छत्रपती संभाजी महाराज, एक दिवा शेतकऱ्यांसाठी, एक दिवा शहीद हुतात्म्यांसाठी, एक दिवा मावळ्यांसाठी, एक दिवा अत्याचाराला बळी पडलेल्या आईबहिणीसाठी' अशी संकल्पना ठेवून साजरा करण्यात आला.



सदर दीपोत्सव सलग तीन दिवस चालत असतो. या कार्यात सर्व शिवभक्तांची दीपावली शिवस्मारकावरच साजरी होत असते. त्यामध्ये शिवस्मारकावर विविध विषय मांडण्यात येत असतात. यावर्षी वरील संकल्पना मांडण्यात आली होती. आज सोशल मीडियावर शिवभक्तीचा कांगावा करणाऱ्या शिवभक्तांना यातून आवाहन करण्यात आले की, छत्रपती शिवाजी महाराज  व छत्रपती संभाजी महाराज हे फक्त फेसबुक व्हाट्सऍपवरच मर्यादित न ठेवता त्यांचे विचार आचरणात आणावे. याप्रसंगी अजय सुपेकर, संतोष जाधव, मयूर चव्हाण, परेश सोनवणे, राहुल तळेकर, अरुण सुपेकर, तेजस चव्हाण, प्रीतम सोनवणे, अनिकेत सताळे, दत्ता भागिले, रितिक खैरे, कार्तिक महाजन, सुधाकर वक्ते, प्रदीप गायकवाड, राहुल वक्ते यांसह शिवप्रेमी उपस्थित होते.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत