कोपरगांव प्रतिनिधी कोपरगांव शहरातील नागरिकांना अनेक वर्षापासुन पिण्यांच्या पाण्यांचे तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याकरीता पाच नंब...
कोपरगांव प्रतिनिधी
कोपरगांव शहरातील नागरिकांना अनेक वर्षापासुन पिण्यांच्या पाण्यांचे तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याकरीता पाच नंबर साठवण तळयाचे प्रकल्पाकरीता भारतीय जनता पक्ष व शिवसेना गटनेत्यासह सर्व नगरसेवकांनी प्रशासकीय व तांत्रीक मान्यतेकरीता लागणारे सर्व ठराव नगरपरिषदेत वेळोवेळी बहुमताने मंजुर केलेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी शहरातील नागरिकासाठी पिण्यांचे पाण्यांसाठी साठवण तलाव क्रमांक ५ करीता तांत्रीक मंजुरी देवुन त्यात चार व पाच या दोन जाचक अटी घातल्या आहे, त्या शहरवासियांच्या भवितव्याच्यादृष्टींने अडचणीच्या असल्याने त्या वगळण्यांत याव्या व तांत्रीक मंजुरी संदर्भात सविस्तर अहवाल सादर करून तो पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवून त्यावर निर्णय करावा या मागणीचे निवेदन भाजपा गटनेते रविंद्र पाठक, सेनेचे गटनेते योगेश बागुल, कैलास जाधव, राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, स्वप्निल निखाडे व सर्व भाजपा सेना नगरसेवकांच्या स्वाक्षरीने नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सोमवारी निवेदन देण्यांत आले.
या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, पालिका साठवण तळे क्रमांक ५ तयार करतांना तांत्रीक मंजुरीमधील अट क्रमांक ४ व ५ मध्ये नमुद केलेले आहे की, निळवंडे शिर्डी कोपरगांव या बंदिस्त संयुक्त पाणी पुरवठा योजनेकरीता कोपरगाव नगरपरिषदेस वगळण्यात यावे व तसेच निळवंडे धरणावरील कोपरगांव नगरपरिषदेस मंजुर असलेले धरणावरील आरक्षण रदद करण्यांत यावे अशी अट नमुद केलेली आहे. सदरच्या अटी हया कोपरगांव शहरातील जनतेच्या भविष्याच्या दृष्टीकोनातुन हिताच्या नाहीत.
कोपरगांव शहरालगत अनेक महाविद्यालये, सहकारी साखर कारखाने, औद्योगिक वसाहत, नव नवीन उपनगरे, नव्यांने निर्माण झालेला नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग तसेच आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र श्री साईबाबा संस्थान येथे दर्शनाकरीता अनेक भाविकांची कोपरगांव रेल्वेस्टेशन येथे ये जा चालु असते., तसेच कोपरगांव शहरास कोपरगांव ग्रामिण भाग (त्रिशंकु भाग) नव्यांने जोडण्यांत आला आहे, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, कोपरगांव शहराचे विस्तारीकरण मोठया प्रमाणांत वाढत आहे.त्याअनुषंगाने कोपरगांव शहरातील नागरिकांना पिण्यांचे पाण्यांसाठी निळवंडे धरणावर सर्व शासकीय मंजुरीनुसार आरक्षीत असलेले पिण्यांचे पाण्यांचे आरक्षण हे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे तांत्रीक मंजुरीमधील अट क्रमांक ४ व ५ मध्ये कोपरगांव शहरवासियांचे अहित आहे, त्यामुळे निळवंडे धरणावर कोपरगाव नगरपरिषदेकरीता असलेले आरक्षण रदद करू नये व तसेच निळवंडे शिर्डी कोपरगांव या बंदिस्त संयुक्त पिण्यांचे पाईपलाईन योजनेतुन कोपरगांव नगरपरिषदेचा समावेश वगळु नये, साठवण तलाव क्रमांक ५ करीता दिलेल्या तांत्रीक मंजुरीमधुन अट क्रमांक ४ व ५ वगळण्यांत यावी व तसेच तलाव क्रमांक ५ करीता मिळालेल्या तांत्रीक मंजुरीनुसार संपुर्ण प्रकल्प अहवाल पालिका सभागृहात नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवुन त्यावर निर्णय व्हावा असे शेवटी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत