राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर कंटेनरने कारला उडविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आह...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर कंटेनरने कारला उडविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.
या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना तातडीने साई प्रतिष्ठाणचे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात व्हॅगेनार कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताचा मोठा आवाज होताच स्थानिक नागरिक व तरुणांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातातील जखमी हे संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील असल्याचे समजते.
गतिरोधक ठिकाणी कंटेनर चालकाचा वेगाचा ताबा सुटल्यामुळे तो सरळ कारवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत