कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदयजी सामंत साहेब यांचे हस्ते सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री....
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदयजी सामंत साहेब यांचे हस्ते सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री.सुशांतजी घोडके सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा वतीने कोविड योध्दा-सांस्कृतिक नायक पुरस्कार व विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन अहमदनगर येथील तलाठी महासंघाचे माऊली सभागृहात करण्यात आले होते.अहमदनगर जिल्ह्यातील १५ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी शिर्डी उपविभागात कोविड संकटात सुरुवातीपासून अहोरात्र आपत्कालीन मदतकार्य करणारे तसेच ज्ञान,कला,राज्य नाट्य,स्वच्छता,जलशक्ती, वृक्षारोपण,पर्यावरण यासह विविध सामाजिक उपक्रम, शिवजयंती उत्सव, विविध स्पर्धा, बालरंगभूमी परिषद यामाध्यमातून नवोदितांना २१ वर्षांपासून व्यासपीठ उपलब्ध करून देणारे...राज्य व देशपातळीवर सार्वजनिक कार्यातून ठसा उमठविणारे सूर्यतेज संस्थापक श्री.सुशांतजी घोडके सर यांचा रोपांचे सन्मानप्रतिक देऊन "विशेष सन्मान" महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदयजी सामंत साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी अहमदनगरचे आमदार श्री.संग्रामभैया जगताप, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे, विरोधीपक्षनेते श्री.संपतराव बारस्कर,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे सहकार्यवाह व महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाचे सदस्य श्री.सतिषदादा लोटके, नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य श्री.सतिषराव शिंगटे,अहमदनगर शाखेचे अध्यक्ष श्री.अमोलजी खोले, चित्रपट महामंडळ संपर्क प्रमुख व कोविड योध्दा श्री.शशिकांतभाई नजान, बालरंगभूमी परिषदेच्या सौ.ऊर्मिलाताई लोटके यांचे सह नाट्य-चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व बाल रंगभूमीपरिषदेचे सदस्य,कलावंत उपस्थित होते.
सूर्यतेज संस्थापक श्री.सुशांतजी घोडके सर यांना कलाध्यापक संघटनेचा "कलाउपासक" पुरस्कार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यंगचित्रात "रौप्य पदक",अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा "नाट्य मंदार" पुरस्कार, वीरशैव भूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासन शिर्डी उपविभागाचा "कोविड योध्दा" पुरस्कार जाणता राजा प्रतिष्ठानचा "समाजरत्न" पुरस्कार,"वृक्षमित्र पुरस्कार" यासह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...या विशेष गौरवाने त्यांच्या सन्मानात मानचा तुरा खोवला आहे...या विशेष सन्मान बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत