राहुरी(प्रतिनिधी):- कोरोना काळात बंद असलेला राहुरी येथील आठवडे बाजार तातडीने सुरू करावा अशी मागणी आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्य...
राहुरी(प्रतिनिधी):-
दिलेल्या निवेदनात म्हंटले की, कोरोना संसर्गामुळे राहुरी येथील गुरुवारचा आठवडे बाजार गेल्या एक ते दीड वर्षापासून प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. सध्य स्थितीला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कोराना लसीकरण मोहिमेमुल आजार रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
आठवडे बाजार बंद असल्याने शेतकरी तसेच बाजारकरू यांचा जीवन मरणाचा प्रश्न गँभीर बनला आहे . त्यामुळे येत्या गुरुवार 25 नोव्हेंबर 2021 पासून राहुरीतील आठवडे बाजार तातडीने सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, वंचित आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, आरपीआय राहुरी तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, शहराध्यक्ष सचिन साळवे, दुर्गेश वाघ, मयुर सुर्यवंशी, संतोष दाभाडे, बाळासाहेब म्हस्के, बबन साळवे, नविन साळवे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत