समृद्धीच्या प्रकल्पबाधित व परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा -आ. आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समृद्धीच्या प्रकल्पबाधित व परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा -आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी:-   कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच अने...

कोपरगाव प्रतिनिधी:-



 कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक रस्ते खराब झाल्यामुळे दळणवळणासाठी अडचणी येत आहे. याकडे समृद्धी महामार्ग व्यवस्थापनाने  गांभीर्याने लक्ष घालून प्रकल्प बाधित व परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी समृद्धी महामार्गाच्या काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या  अधिकाऱ्यांना केल्या आहेत.  


              आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे नुकतीच समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शनचे अधिकारी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणींबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.


          ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाच्या लगत सर्व्हिस रोड तयार करावे. समृद्धी महामार्गाच्या डक्टचा (महामार्गाखालून जाणारा भूमिगत रस्ता) आकार वाढवावा जेणेकरून मोठ्या वाहनांना अडचणी येणार नाहीत. समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतांना तालूक्यातील शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे नुकसान झाले आहे. हि नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर अदा करावी. समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या गौण खनिज व इतर साहित्यांची सातत्याने वाहतूक होऊन अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हे रस्ते देखील तातडीने दुरुस्त करून द्यावेत. भविष्यात प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशा सूचना यावेळी आ. आशुतोषदादा काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.


           यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, रोहिदास होन, राहुल रोहमारे, दाणे पाटील, विठ्ठल जावळे, सचिन आव्हाड, दिपक रोहोम, गायत्री कन्स्ट्रक्शनचे ताताराव डुंगा, सुमेध वैद्य, दिपक बांगर, महेश टी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे एस.के.बावा, नासिर शेख आदी उपस्थित होते.


           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत