देवळाली प्रवरा शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशात बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्काराने सन्मानित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशात बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्काराने सन्मानित

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी):- केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ अमृत मह...

देवळाली प्रवरा(प्रतिनिधी):-


केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव 2021 मध्ये सर्वेक्षण झालेल्या भारतातील सर्व शहरांमधून मानांकन मिळालेल्या शहरांचा पुरस्कार वितरण सोहळा 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंग पुरी, राज्यमंत्री कौशल कुमार, छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग, अंदमान निकोबारचे उपराज्यपाल केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते दिल्ली मध्ये वितरित करण्यात आला, देवळाली प्रवरा शहरास देशभर राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्कार, राज्यात दुसरी रँक, देशाच्या पश्चिम विभागात चौथी रँक व कचरा मुक्त शहरामध्ये थ्री स्टार सिटी मानांकन असे पुरस्कार मिळाले आहेत अशी माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिल्ली येथून भ्रमणध्वनी द्वारे दिली.



 स्वच्छ अमृत महोत्सव (सर्वेक्षण)-2021 मध्ये देशातील महानगर पालिका, छावणी परिषदा, नगरपरिषद व नगरपंचायती 4320 शहरांनी भाग घेतला होता, स्वछ राज्याचा पहिला क्रमांक छत्तीसगड राज्याला मिळाला तर दुसरा क्रमांक महाराष्ट्र राजयला मिळाला, मोठ्या शहरांमध्ये त्यात सलग पाचव्यांदा इंदोर शहराने प्रथम क्रमांक मिळवला, दुसरा सुरत शहर तर तिसरा क्रमांक विजयवाडा या शहरांना मिळाला, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या सर्वेक्षणात पहिले तिन्ही क्रमांक महाराष्ट्रातील शहरांनी पटकावले त्यात प्रथम विटा, द्वितीय लोणावळा तर तृतीय क्रमांक सासवड शहराने पटकावला, बाकी शहरांना स्वच्छतेमध्ये तारांकित शहरांचे मानांकनाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



त्यात आपल्या देवळाली प्रवरा शहरास स्वच्छ अमृत महोत्सव (सर्वेक्षण )2021 मध्ये आपल्या देवळाली प्रवरा शहरास देशातील 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या सर्व शहरामध्ये बेस्ट सेल्फ सस्टनेबल सिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व राज्यात स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 2 रँक मिळाला तर देशाच्या पश्चिम विभागात 4 था रँक मिळाला आहे व कचरा मुक्त शहरामध्ये थ्री स्टार सिटी मानांकनाचा पुरस्कार मिळाला व स्वच्छ सर्वेक्षण 2021 बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी* पुरस्कार व कचरा मुक्त शहर थ्री स्टार मानांकनाचा पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा व भारत मिशनच्या सहसचिव रूपा मिश्रा हस्ते वितरित करण्यात आला यावेळी आपल्या शहराचे प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी अजित निकत, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे, आरोग्य सभापती सचिन ढुस, कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके व संभाजी वाळके यावेळी उपस्थित होते.

              सकाळी 11 वाजता राष्ट्रपतींचे आगमन झाले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी स्वच्छ अमृत महोत्सव 2021 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्यानंतर केंद्रीय केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे भाषण झाले, त्यानंतर सर्वेक्षणाच्या विविध भागात देशातील प्रथम तीन आलेल्या शहरांना प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले व त्यांनंतर राष्ट्रपतींचे मनोगत झाले व राजशिष्टाचारानुसार राष्ट्रगीत होऊन राष्ट्रपतींचे पुढील कार्यक्रमासाठी प्रयाण झाले.व उर्वरित सर्व शहरांना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर, सचिव दुर्गाशंकर मिश्रा, सहसचिव रूपा मिश्रा यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले.



"आपल्या देवळाली प्रवरा शहरास देशभर राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशात  बेस्ट सेल्फ-सस्टनेबल सिटी पुरस्कार, राज्यात दुसरी रँक, देशाच्या पश्चिम विभागात चौथी रँक व कचरा मुक्त शहरामध्ये थ्री स्टार सिटी मानांकन असे पुरस्कार मिळाले आहेत, हे सर्व शहरवासीयांच्या व माझ्या सहकारी नगरसेवकांच्या सहकार्याने आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामांमुळे मिळाले आहे हे पुरस्कार मी माझ्या सर्व स्वच्छता कर्मचारी व शहरवासीयांना समर्पित करतो..

      सत्यजित कदम, नगराध्यक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत