कोपरगाव/प्रतिनिधी:- महाराष्ट्र वासुदेव-जोशी समाजाची पुणे येथील कृष्णसुंदर गार्डनमध्ये राज्यस्तरीय बैठक राज्याध्यक्ष दिलीप परदेशी यांच्या ने...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
महाराष्ट्र वासुदेव-जोशी समाजाची पुणे येथील कृष्णसुंदर गार्डनमध्ये राज्यस्तरीय बैठक राज्याध्यक्ष दिलीप परदेशी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडली. यामध्ये अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून कोपरगावचे नीलेश काकडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.
नंदकुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्हा संघटक रवींद्र सुपेकर, जिल्हाध्यक्षपदी नीलेश काकडे, जिल्हा सरचिटणीसपदी दीपक सुपेकर, जिल्हा प्रवक्तेपदी समीर नाईक, कोपरगाव शहराध्यक्षपदी विजय सुपेकर, उपशहराध्यक्षपदी संतोष सुपेकर, शहर संघटकपदी संजय सुपेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अनिल गंगावणे, समीर सुपेकर यांसह समाज बांधव उपस्थित होते. नूतन जिल्हाध्यक्ष काकडे यांचे मनसेसह सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत