देवळाली प्रवरा/राजेंद्र उंडे:- अहमदनगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ६ नोव्हेंबर रोजी आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला होता. तोफखाना पोलिस...
देवळाली प्रवरा/राजेंद्र उंडे:-
अहमदनगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ६ नोव्हेंबर रोजी आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला होता. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.यात देवळाली प्रवराच्या कन्या डॉ.विशाखा शिंदे यांचाही समावेश आहे.फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांने डाँ विशाखा शिंदे हि त्या विभागाची वैद्यकिय अधिकारी आहे. असे समजुन डाँ.शिंदे विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.परंतू आरोग्य विभागाने आपली चुक तातडीने दुरुस्त करुन निलंबन मागे घेतले. पोलिसांनी चुकीची फिर्याद दाखल करुन एका निष्पाप शिकाऊ डाँक्टरचा बळी देणाऱ्या फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांसह तपासी पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांची चौकशी करण्यात यावी. त्या विभागाचा सरकारी सेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देवळाली प्रवरा येथिल विविध संघटनाकडून केली जात आहे.शिकाऊ डाँक्टरचा बळी देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा विविध प्रकारचे आंदोलने छेडले जातील असा इशारा संघटनांनी दिला आहे.
बेरियाट्रिक सर्जन डॉ.जयश्री तोडकर यांनी देखील ट्विट मध्ये अटक करण्यात आलेल्या डॉ.विशाखा शिंदे यांच्यावर भाष्य केले आहे. डॉ.जयश्री तोडकर यांनी केलेली पोस्ट समाज माध्यमाच्या मधून प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यामुळे शिकाऊ डॉक्टर वरील कारवाई हा चर्चेचा विषय ठरत आहे.जिल्हा रुग्णालयात डाँ.शिंदे या अस्थीरोग विभागात पदव्युत्तर पदविका करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत.शिकाऊ डाँक्टरवर वैद्यकिय अधिकाऱ्याची जबाबदारी सोपवता येते का? असा प्रश्न उपस्थित केला गेल्याने आरोग्य विभागाने डाँ.शिंदे यांच्या निलंबनाचा आदेश मागे घेवून सुधारणा केली आहे.जळीतकांड ज्या दिवशी घडले त्यादिवशी दिवसभर आरोग्य विभागाने पोलिसांकडे कोणतीही फिर्याद दाखल केली नसल्याने जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशान्वये तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेरअहमद मुजावर यांनी फिर्याद दिली. त्याच वेळी आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी टाकून निलंबित केले.त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकिय अधिकारी डॉ.सुरेश ढाकणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे,परीचारीका सपना पठारे आदींना निलंबित केले तर परीचारीका आस्मा शेख, चन्ना आनंत या दोघींची सेवा समाप्त करण्यात आली. या निलंबनाच्या कारावाई नंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. निलंबाणाच्या कारवाईत शिकाऊ डाँक्टरला निलंबित केले गेले असल्याचे समोर आल्या नंतर आरोग्य उपसंचालकांनी वेळीच नविन आदेश काढून डाँ.शिंदे यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याचे पञ जिल्हा रुग्णालयास पाठविण्यात आले होते.जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्नितांडव प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना निलंबित करण्याचे आदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आली होती याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून स्वतः ही माहिती दिली होती.
या प्रकरणातील निलंबित केलेल्या शिकाऊ डाँक्टर तथा आरोग्य अधिकारी डॉ. विशाखा शिंदे यांचे निलंबन रद्द केले असल्याची माहिती आरोग्य सेवा उपसंचालकांच्या पत्राद्वारे पुन्हा जिल्हा रुग्णालयाला कळवण्यात आली आहे.परंतू आरोग्य उपसंचलाकांनी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीतून डाँ.शिंदे यांचे नाव वगळण्यासाठी कोणतेही पञ दिले नाही.त्यामुळे दाखल गुन्ह्यात त्यांचे नाव तसे राहिले असल्याचे कर्मचारी वर्गातुन बोलले जात आहे.जिल्हा रुग्णालयातील शासकीय कायम सेवेत असणाऱ्या जबाबदार आधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्या ऐवजी शिकाऊ डाँक्टरवर गुन्हा दाखल झाल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. सरकारी सेवेत असणाऱ्या डाँक्टरवर गुन्हा दाखल न करता शिकाऊ डाँक्टरचा बळी दिला गेला आहे. डाँ.शिंदे यांचे नाव पुढे करणारा तो अधिकारी कोण त्याची चौकशी केली पाहिजे.त्या अधिकाऱ्याने कोणाला वाचविण्यासाठी डाँ.शिंदेचा बळी दिला आहे याची चौकशी होवून त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
आरोग्य उपसंचालकांनी डा.शिंदे यांचे निलंबन मागे घेतल्याचे पञ जिल्हा रुग्णालयास पाठविले होते. सदर पञ तपासी पोलिस अधिकाऱ्यां पर्यंत का पोहचवले नाही.असा हि प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. हे पञ जाणिव पुर्वक पोलिसां पर्यंत पोहचू दिले नाही का? डाँ.शिंदे यांच्या आई वडीलांनी तर जिल्हा रुग्णालयातील सरकारी सेवकास वाचविण्यासाठीच माझ्या मुलीचा बळी दिला असल्याचा आरोप केला आहे.
डाँ.शिंदे शिकाऊ असल्याने आरोग्य उपसंचालक यांनी निलंबन मागे घेतले.पोलिसांनी माञ डाँ.शिंदेवरील गुन्हा मागे न घेता त्यांना पोलिस कोठडीत डांबून ठेवले आहे.त्या पुर्णपणे दडपणाखाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या जळीत व 11 जणांच्या मृत्युस जबाबदार सरकारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करुन फिर्यादी व तपासी पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांची चौकशी करुन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी देवळाली प्रवरातील संघटना जनतेस द्यावा अशी मागणी शिवबा प्रतिष्ठाणचे व विद्यमान नगरसेवक अदिनाथ कराळे,मनसेचे नितिन भुतारे, आरपीआय आठवले गटाचे सुरेंद्र थोरात,आरपीआय आंबेडकर गटाचे भाऊसाहेब पगारे यांच्यासह दहा ते बारा विविध संघटनानी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत